Tamannaah Bhatia Dance With Fan : तमन्ना भाटियाचा विमानतळावरच 'कावाला' डान्स, व्हायरल व्हिडिओ बघून म्हणाल 'शॉक लगा लगा'...

Tamannaah Bhatia Dances On Kaavaalaa Song At Airport : तमन्नाने एअरपोर्टवर एका चाहत्यासोबत या गाण्यावर डान्स केला आहे.
Tamannaah Bhatia Dances On Kaavaalaa Song At Airport
Tamannaah Bhatia Dances On Kaavaalaa Song At Airport Saam Tv
Published On

Tamannaah Bhatia Dance Video Goes Viral : तमन्ना भाटिया ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनंतर तमन्नाने बॉलिवूडवरही आपली छाप सोडली आहे. तमन्नाच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक होत असतं. तमन्नाचा आगामी 'जेलर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.याच चित्रपटातील एका गाण्यावर तमन्नाने चक्क एअरपोर्टवर डान्स केला आहे.

तमन्ना भाटिया ही नेहमीच काही न काही कारणांनी चर्चेत असते. अनेकदा तमन्ना वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेचा विषय होत असते. नुकतीच तिची 'लस्ट स्टोरी २' ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानंतर तमन्ना लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत झळकणार आहे.

Tamannaah Bhatia Dances On Kaavaalaa Song At Airport
Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा'च्या कमाईत विक्रमी वाढ; ३ दिवसात केली १० कोटींहून अधिक कमाई

'जेलर' चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तमन्नाचा याच गाण्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. तमन्नाने एअरपोर्टवर एका चाहत्यासोबत या गाण्यावर डान्स केला आहे. सेलिब्रिटी नेहमीच एअरपोर्टवर पापाराझी समोर स्पॉट होत असतात. अशातच तमन्नाचा डान्स मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांना फार आवडलेला दिसत आहे.

तमन्ना या व्हिडिओत एका चाहत्यासोबत डान्स करत आहे.या व्हिडिओत तमन्नाने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि ट्राउझर असा लूक केला आहे.तमन्ना ही नेहमीच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत असते. त्यातच आता या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

कवाला गाणं

तमन्नाचे जेलर चित्रपटातील 'कावाला' हे गाणं सन टीव्ही या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. गाण्यात तमन्ना भाटिया खूप छान डान्स करताना दिसत आहे.रजनीकांत आणि तमन्ना एकत्र गाण्याची हुक स्टेप करत आहेत. हे गाणे शिल्पा राव आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी गायले आहे.

गाण्याचं वैशिष्ट म्हणजे तमन्ना डान्स करताना मागे सूंदर व्हिएफएक्स दिसत आहेत. त्यामुळे गाण्याला वेगळाच लूक आला आहे.गाणे प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. एवढ्या कमी वेळात गाण्याला २३ मिलियन एवढे व्ह्यूज आले आहेत.

नेटकऱ्यांनी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी तमन्नाची तुलना शकीराशी केली आहे .नेटकऱ्यांनी तमन्नाला या गाण्यावरुन 'भारतीय शकीरा' असंही म्हटलं आहे.

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तमन्ना नुकतीच 'लस्ट स्टोरी २'मध्ये दिसली होती. तर तमन्ना लवकरच 'जेलर' आणि 'भोला शंकर' या चित्रपटात झळकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com