kartik aryan saam tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aryan: कार्तिक आर्यनने सांगितले पान मसाला अन् फेअरनेस क्रिमची जाहिरात न करण्यामागचे कारण; म्हणाला, मला जे पटत नाही...

Kartik Aryan Interview: कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. कार्तिक आर्यन हा फेअरनेस क्रिम आणि पान मसाल्याची जाहिरात करत नाही. ही जाहिरात न करण्यामागचे कारण कार्तिकने सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडमधील कार्तिक आर्यन हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कार्तिक आर्यन नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कार्तिक आर्यन चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कार्तिकने काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती. परंतु त्याने आता ही जाहीरात करणे बंद केले आहे. जाहीरातीचा करारही पुन्हा रिन्यू केला नाही. जर करार रिन्यू केला असता तर चुक झाली असती, असं कार्तिक आर्यनने सांगितले आहे.

लल्लनटॉप या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना कार्तिकने ही माहिती दिली आहे. 'काही दिवसांपूर्वी मी फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती. मात्र, मी ही जाहिरात करणे बंद केले आहे. मी काहीतरी चुकीचे करत आहे, असं मला वाटले. म्हणूनच मी जाहिरातीचा करारदेखील रिन्यू केला नाही, असं कार्तिकने सांगितले.

या जाहिरातीमुळे कार्तिक आर्यनला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. फेअरनेस क्रिम लावून लोक गोरे होतात, असं या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे लोकांचे म्हणणे होते. त्यानंतर कंपनीने या क्रिमचे नावदेखील बदलले. यानंतरच कार्तिकने फेअरनेक क्रिमची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला.

कार्तिकला पान मसाल्याच्या जाहिरातीसाठीदेखील विचारण्यात आले होते. मात्र, त्याने ही जाहिरात करण्यास नकार दिला. याबाबत कार्तिकने सांगितले की, पान मसाल्याची जाहिरात करण्यासाठी अनेक ब्रँड्सने मला विचारले होते. मात्र, मी नकार दिला. माझा या गोष्टींशी संबंध नाही. मग मी त्या गोष्टींची माहिती प्रेक्षकांना का देऊ. मला ज्या गोष्टी पटत नाही. त्या गोष्टी मी टाळण्याचा प्रयत्न करतो.

कार्तिक आर्यनने खूप कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं नावलौकिक कमावले आहे. कार्तिकने अनेक चित्रपटात काम केले आहे. कार्तिक लवकरच चंदू चॅम्पियन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT