Kartik Aaryan News : कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा महागात पडली, तरुणीला ८२ लाखांचा गडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

Kartik Aaryan Fans News : अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही. अभिनेत्याच्या नावाने फॅनची फसवणूक झाली आहे.
Kartik Aaryan News : कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा महागात पडली, तरुणीला ८२ लाखांचा गडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Kartik Aaryan FansInstagram

कार्तिक आर्यनचा येत्या १४ जूनला 'चंदू चॅम्पियन'ला रिलीज होणार आहे. सध्या ह्या चित्रपटामुळे अभिनेता कमालीचा चर्चेत आला आहे. अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते काय करतील आणि काय नाही याचा नेम नाही. असाच काहीसं केलंय कार्तिक आर्यनच्या एका चाहत्याने. अभिनेता कार्तिक आर्यनच्या नावाने एका स्त्रीची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

Kartik Aaryan News : कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा महागात पडली, तरुणीला ८२ लाखांचा गडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Kangana Ranaut Slapped : 'आईच्या सन्मानासाठी हजारो नोकऱ्यांचा त्याग करेल...', कंगना रणौतला कानशिलात देणाऱ्या CISF कॉन्स्टेबलचं

कार्तिकच्या एका चाहतीने आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. पण इतके पैसे देऊनही कार्तिकच्या चाहत्याची इच्छा अपूर्णच राहिली आहे. खरंतर ही घटना मुंबईमध्ये घडली आहे. कार्तिकच्या फॅनचं नाव ऐश्वर्या असं आहे. ही राहणारी मुंबईच्या गोरेगावमधील आहे. हिची तब्बल ८२.७५ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. तिची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव कृष्णा शर्मा असं आहे. कार्तिक आर्यनला भेटायचे म्हणून या तरुणीने कृष्णा शर्माला तब्बल ८२. ७५ लाख रुपये दिलेले आहे. तिची ही फसवणूक आता झालेली नसून २०२२ या वर्षी झालेली आहे.

खरंतर, कृष्णाने ऐश्वर्याकडून 'लव्ह इन लंडन' नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ८२. ७५ लाख रुपये गुंतवण्यासाठी सांगितले होते. आणि त्या बदल्यात कृष्णा ऐश्वर्याला अभिनेता कार्तिक आर्यनला भेटवून देणार होता. त्याने तिला प्रॉमिस केल्यामुळेच तिने हे पैसे गुंतवले होते. या प्रकरणी त्या तरुणीने आंबोली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार केव्हा दाखल केली आहे, याबद्दलची माहिती नाही. पण आता त्या आरोपीला आंबोली पोलिसांनी अटक केलेली आहे. त्या भामट्याविरोधात फक्त आंबोली स्टेशनसह वाकोला, मुंबई विमानतळ, दिल्लीतील कॅनोट प्लेस, आणि चेन्नई E3 टेन्याम्पेट या पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल आहे.

Kartik Aaryan News : कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा महागात पडली, तरुणीला ८२ लाखांचा गडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Adah Sharma : अदा शर्माला 'बस्तर'च्या शुटिंगवेळी झाला होता गंभीर आजार, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबोली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान, त्या तरुणीने कृष्णाला इतकी मोठी रक्कम हप्त्या हप्त्याने दिलेली आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने ही रक्कम त्याकडून घेतलेली होती.

त्या तरूणीने पोलिसांना तक्रारीमध्ये सांगितले की, "कृष्णाने मला कार्तिक आर्यनला भेटवणार असं सांगितले होते. म्हणून मी त्याला पैसे दिले. पण ज्यावेळी मी त्याच्याकडून पैसे पुन्हा मागू लागले त्यावेळी तो गायब झाला," त्याच्या तक्रारीनंतर, तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.

अलीकडेच त्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलमधून अटक केली आहे. त्यासोबतच त्याच्या आणखी तीन साथीदारांनाही बेंगळुरू पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

Kartik Aaryan News : कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा महागात पडली, तरुणीला ८२ लाखांचा गडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Mukesh Khanna News : अयोध्येतील भाजपच्या पराभावावर मुकेश खन्नांची पोस्ट, नेटकऱ्यांनी पलटूराम म्हणत केलं ट्रोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com