अभिनेत्री अदा शर्मा हिने अवघ्या बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अदा शर्मा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच अदा तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे. अदा एका गंभीर आजाराच्या विळख्यात सापडली आहे. फिजिकल ट्रांसफॉर्मेशनमुळे अभिनेत्रीला गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. याबद्दलची माहिती तिने स्वत: एका मुलखतीतून दिली आहे.
अदा शर्माने नुकतीच 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, "मला माझ्या चित्रपटांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फिगरची गरज होती. 'द केरला स्टोरी'साठी, मला पहिल्या भागात मला स्लिम आणि ट्रीम दिसायचे होते, जेणेकरून मी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी दिसेल. नंतर 'कमांडो'साठी, मला एक धीट मुलगी दिसायचं होते. नंतर 'सनफ्लॉवर'साठी मला कामुक आणि सेक्सी दिसायचे होते, कारण मी एका डान्सबार मधल्या मुलीची भूमिका साकारणार होते."
अदा शर्मा पुढे म्हणाली, " गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘बस्तर’मध्ये मला माझ्या तब्येतीत वाढ करायला लागली होती. या चित्रपटासाठी मी माझं खूप वजन वाढवलं होतं. माझं वजन झटकन वाढावं यासाठी मी दिवसाला १० ते १२ केळी खायचे. पण यासोबतच अनेक समस्यांनाही मला तोंड द्यावे लागत होते. चित्रपटात खूप ॲक्शन सीन्स होते. आमच्याकडे ८ किलो वजनाची बंदूक असायची जी आम्ही खडकाळ प्रदेश आणि पर्वतांवरून तिला न्यायला लागायचे. सुका मेवा आणि आळशीच्या बियांचे लाडू हे मी नेहमी झोपण्याच्या अर्धा तास आधी त्यापैकी दोन खायचे. हे प्रोटिनयुक्त पदार्थ कायमच माझ्याजवळ असते."
अदा शर्मासाठी 'बस्तर' चित्रपट खूपच चॅलेंजींग होता, असं तिने सांगितले. "मला ट्रेनिंगच्या दिवसांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नेमके शुटिंगच्या दिवसातच मला एंडोमेट्रियोसिस आजाराचे निदान झाले. या आजारामध्ये मासिक पाळी थांबत नाही. मला सलग ४८ दिवस रक्तस्त्राव होत होता." असं अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.