Kartik Aaryan Movie Chandu Champion you tube
मनोरंजन बातम्या

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

Kartik Aaryan Movie Chandu Champion: 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत होते. कार्तिक आर्यनच्या होमटाऊन ग्वाल्हेरमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या धूमधडाक्यात रिलीज करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कार्तिक आर्यन स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ट्रेलर रिलीज होताच साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झालाय. ट्रेलर रिलीज होण्याआधी पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटाचे वेगवेगळे पैलू दाखवण्यात आले होते. निर्मात्याकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यनची रेंज आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनही दाखवण्यात आले आहे.

ट्रेलर पूर्णपणे अप्रतिम असून अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. प्रेक्षकांची ट्रेलरवरील प्रतिक्रिया पाहता हा चित्रपट चॅम्पियन ठरेल असं वाटत आहे. ग्वाल्हेरमध्ये लाँच केलेला ट्रेलर हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला आहे. यात एका जिद्दी व्यक्तीचा काहणी दाखवण्यात आलीय. निर्मात्यांनी प्रदर्शित केलेला ट्रेलर शानदार आणि मनोरंजक आहे.

हा ट्रेलर उत्तम सिनेमॅटिक अनुभव देणारा आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात दाखल होईल तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल अशी आशा वर्तवली जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कार्तिक आर्यनच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाचे नाव जोडले जाईल असे वाटत आहे.

'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत होते. कार्तिक आर्यनच्या होमटाऊन ग्वाल्हेरमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या धूमधडाक्यात रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी शिट्ट्या वाजवल्या. दरम्यान साजिद नाडियावडाला आणि कबीर खान यांनी मिळून 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची निर्मिती केलीय. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT