Kartik Aaryan rejected pan masala ad worth 9 crore Instagram/@kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: पान-मसाल्याच्या जाहिरातीस नकार! कार्तिक आर्यनने चाहत्यांच्या आरोग्यासाठी धुडकावली ९ कोटींची ऑफर

Kartik Aaryan turned down a deal worth Rs 9 crores to endorse pan masala: एवढी मोठी रक्कम आणि ऑफर नाकारणं तितकं सोपं नसलं तरी कदाचित कार्तिक आर्यनचे स्वतःचे विचार आहेत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: भारतात पान-मसाला, गुटखा, तंबाखू इत्यादी पदार्थांचे सेवन करणाऱ्याची सख्या मोठी आहे. त्यामुळे या अंमली पदार्थांच्या जाहिरातीसाठीही मोठा खर्च केला जातो. अजय देवगण, अमिताभ बच्चन शाहरुख खान असे अनेक दिग्गज पान-मसाल्याची जाहिरात करतात. चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकार जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतात. कपड्यांपासून चपलांपर्यंत सर्व प्रकारच्या जाहिराती देऊन ते खिसे भरत आहेत. मात्र अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) सुमारे ९ कोटींची ऑफर नाकरण्याचं धाडस केलं आहे. हा पान-मसाल्याची (Pan Masala) जाहिरात (advertisement) असल्याने ती नाकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जाहिरातीसाठी त्याला ९ करोड रुपयांची ऑफर दिली जात होती, मात्र कार्तिकने त्याला नकार दिला आहे. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Kartik Aaryan Latest News)

हे देखील पाहा -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांच्या आरोग्यासाठी अशी जाहिरात करण्यास नकार दिला आहे. यासाठी त्याला ९ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. या प्रकरणावर कार्तिक आर्यनने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज नीलगाणी यांनीही कार्तिकच्या या कृतीचे कौतुक केले आहे. एवढी मोठी रक्कम आणि ऑफर नाकारणं तितकं सोपं नसलं तरी कदाचित कार्तिक आर्यनची स्वतःचे विचार आहेत. या गोष्टी आजच्या नव्या कलाकारांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. पान मसाला जाहिरात नाकारुन कार्तिक यूथ आयकॉन बनला आहे.

यापूर्वी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना पान-मसालाच्या जाहिरातींसाठी नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यासाठी अक्षय कुमारला माफीही मागावी लागली. मात्र कार्तिक आर्यनने ऑफर नाकारात चाहत्यांची मनं जिंकली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. याशिवाय त्याचा पुढचा चित्रपट शहजादा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT