Kartik Aaryan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने मुंबईत खरेदी केले लग्जरी ऑफिस, कोटींमध्ये आहे किंमत

Kartik Aaryan Buy Property : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने मुंबईत लग्जरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. किती कोटींमध्ये डील झाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

कार्तिक आर्यनने मुंबईत करोडो रुपयांचे आलिशान ऑफिस खरेदी केले आहे.

कार्तिक आर्यन लवकरच 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्तिकने मुंबईत अंधेरी येथे प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) एकामागोमाग सुपरहिट चित्रपट देत आहेत. कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे झळकणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. आता मात्र कार्तिक आर्यन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनने मुंबईत एक लग्जरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनने आपल्या आई-वडीलांसोबत मिळून अंधेरी वेस्टमध्ये 13 कोटी रुपयांना ऑफिस स्पेस खरेदी केली आहे.स्क्वेअर यार्ड्स वृत्तानुसार, कार्तिक आर्यनचे लग्जरी ऑफिस 'सिग्नेचर बाय लोटस' इमारतीत आहे. या मालमत्तेचा रेरा कार्पेट एरिया 176.98 चौरस मीटर (सुमारे 1,905 चौरस फूट) आणि बिल्ट-अप एरिया 194.67 चौरस मीटर (सुमारे 2,095 चौरस फूट) आहे. या करारात तीन कार पार्किंग स्पेस देखील आहेत.

प्रॉपर्टीचा व्यवहार सप्टेंबर 2025 मध्ये नोंदणीकृत झाला होता. ज्यामध्ये 78 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली होती आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. तसेच अलिकडेच कार्तिक आर्यनने 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL)' च्या 'चाटो डी अलिबाग' या किनारी प्रकल्पात 2,000 चौरस फूट जमीन 2 कोटी रुपयांना खरेदी केली.

कार्तिक आर्यनने 2011ला 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. कार्तिक आर्यन आजवर सोनू के टीटू की स्वीटी, लुका छुपी, पति पत्नी और वो, भूल भुलैया 2, भूल भुलैया 3, सत्यप्रेम की कथा, चंदू चॅम्पियन असे अनेक चित्रपट केले आहेत. कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट 31 डिसेंबर 2025 ला रिलीज होणार आहे. 2025चा शेवट आणि 2026 ची सुरूवात प्रेमाने होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT