Ameesha Patel : ५० वर्षांची आमिषा 'या' अभिनेत्यासोबत वन नाईट स्टँडसाठी तयार, म्हणाली "त्याच्यासाठी सर्व तत्त्वे..."

Ameesha Patel Long Term Crush : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने आपला आवडत्या अभिनेत्यासोबत वन नाईट स्टँड करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Ameesha Patel Long Term Crush
Ameesha Patel SAAM TV
Published On
Summary

अमीषा पटेलने वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलला हॉलिवूडचा सुपरस्टार खूप आवडतो.

अमीषा पटेलचा टॉम क्रूज क्रश आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. वयाच्या 50 वर्षी देखील अभिनेत्री फिट आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, "आवडत्या अभिनेत्यासोबत सर्व तत्त्वे बाजूला ठेवून वन नाईट स्टँड करायला तयार आहे." अमीषा पटेलचा आवडता अभिनेता कोण, जाणून घेऊयात.

रणवीर इलाहाबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत अमीषा पटेल म्हणाली की, "मला लहानपणापासून टॉम क्रूज (Tom Cruise) खूप आवडतो. तू जरी कधी त्याच्यासोबत पॉडकास्ट केले. तर मला नक्की बोलव. तो माझा क्रश आहे. माझ्या पेन्सिल बॉक्समध्ये, फाईल्समध्ये त्याचा फोटो होतो. खोलीतही त्याचे पोस्टर्स होते. मी नेहमी म्हणते की, टॉम क्रूजसाठी मी माझी सर्व तत्त्वे बाजूला ठेवू शकते. त्याच्यासाठी काहीही करू शकते. मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करू शकते. "

अभिनेत्री अमीषा पटेल कायम तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली आहे. अमीषा पटेलच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अमीषा पटेलने 2000 साली रिलीज झालेल्या 'कहो ना…प्यार है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन झळकला होता. या चित्रपटामुळे अमीषाला खूप लोकप्रियता मिळाली. चित्रपटाची गाणी आजही खूप गाजतात.

अमीषा पटेल 2023 मध्ये 'गदर 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर 2024ला ती 'तौबा तेरा जलवा' मध्ये पाहायला मिळाली. चाहते आता अमीषा पटेलच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे. अमीषा पटेलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती आपल्या लूकचे तसेच ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Ameesha Patel Long Term Crush
Rihanna : लोकप्रिय गायिका झाली आई; दिला गोंडस मुलीला जन्म, पाहा बाळाचा फर्स्ट लूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com