Amisha Patel
Amisha PatelSaam Tv

Ameesha Patel Birthday: एका निर्णयामुळे होत्याचं नव्हतं झालं... आणि अमीषा पटेलच्या करिअरला ब्रेक लागला

Ameesha Patel Career: अमिषा फक्त सहाय्यक कलाकार म्हणून दिसू लागली.
Published on

Ameesha Patel Gadar Released : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा आज 9 जून रोजी वाढदिवस आहे. अमिषा बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अमिषाने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून अभिनय विश्वात पाऊल ठेवले. अभिनेत्रीने तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. त्यानंतर अमीषाने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

2001 साली सनी देओलसोबत आलेल्या गदर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यासोबतच या चित्रपटातील 'सकीना' म्हणजेच अमिषाच्या अभिनयाची लोकांनी खूप प्रशंसा केली होती, पण अचानक अभिनेत्रीच्या करिअरमध्ये वेगळं वळण आले. अमिषा फक्त सहाय्यक कलाकार म्हणून दिसू लागली. (Latest Entertainment News)

Amisha Patel
Gadar Trailer Re-Released: हिंदुस्थान जिंदाबाद है,था और रहेगा.... सनी देओल-अमिषाचा 'गदर...'चा ट्रेलर पुन्हा आला; असं काय झालं बुआ!

चित्रपटांपेक्षा अमिषाचे नाव वादांमुळे चर्चेत येऊ लागलं. तिने तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोपही केले होते. अमिषाचे नाव एकेकाळी चित्रपट निर्माते विक्रम भट यांच्याशी जोडले गेले होते, ज्याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान केला होता. तसेच अमिषाने लग्नाविषयी बोलून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते, परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

इतकंच नाही तर अमिषा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांमधील वादही खूप गाजले. अभिनेत्रीने तिच्या वडिलांवर 12 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपही केला होता. वडील पैशांचा गैरवापर करतात, असे तिने सांगितले होते. यासाठी अभिनेत्रीने तिच्या वडिलांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती.

Amisha Patel
Gadar 2 In Trouble: गदर 2 चित्रपटातील सीनमुळे वाद; सनी देओलसह निर्मातेही अडचणीत

2009 मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी अमिषा पटेल तिचा भाऊ अश्मित पटेलसोबत सिनेमा हॉलमध्ये दिसली, त्यानंतर तिच्या आणि तिच्या कुटुंबात सर्व काही सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अभिनेत्रीच्या आईने एका मुलाखतीत खुलासा केला की आता त्यांच्यातील वाद संपला आहे.

अभिनेत्रीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, 2002 मध्ये आलेल्या 'हमराज' सिनेमानंतर अमिषाच्या फारसे यश मिळाले नाही. तिचा एकही चित्रपट पडद्यावर कमाल दाखवू शकला नाही. यानंतर तिने काही तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले, पण तिथेही ती अयशस्वी ठरली. याशिवाय अमिषा बिग बॉस सीझन 13 मध्ये देखील सहभागी झाली होती.

आज अमिषाच्या वाढदिवशी तिचा २२ वर्ष जुना चित्रपट गदर एक प्रेमकथा पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com