Dhanshri Shintre & ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अलिबाग ते वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे.
दोन्ही बाजूची वाहने वाहतूक कोंडीत अडकली आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या शनिवार आणि रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची अलिबागकडे धाव घेतल्याची दृश्ये आहेत.
लग्न समारंभामुळे मार्गावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
पोयनाड, पेझारी नाका, धरमतर इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
अरुंद रस्ता आणि वाहनांची संख्या वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मार्गावर वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी आहे, कोंडी फोडताना पोलिसांची दमछा.