बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या 'आशिकी 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा रोमँटिक 'आशिकी 3' (Aashiqui 3) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन साऊथ अभिनेत्री श्रीलीलासोबत (Sreeleela ) झळकणार आहे. नुकतीच कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने सर्वांचे लत्र वेधून घेतले आहे. कार्तिकने श्रीलीलासोबत एक खास फोटो सोशल मिडिया चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि श्रीलीला आरशामध्ये पाहताना दिसत आहेत. श्रीलीलाच्या चेहऱ्यावर एक हास्य दिसत आहे. तर कार्तिक 'आशिकी 3' च्या खास लूकमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो म्हणजे कार्तिक आर्यनने काढलेली एक खास सेल्फी होय. या फोटोला त्याने एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "एका दीर्घ वेळापत्रकाचा शेवटचा समाधानकारक दिवस." सध्या कार्तिक आर्यन आणि श्रीलीला 'आशिकी 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
'आशिकी 3'चित्रपटामुळे सोशल मीडियावर कार्तिक आर्यन आणि श्रीलीला डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आता कार्तिक आर्यनने पोस्ट केलेल्या फोटोमुळे अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. 'आशिकी 3'चे दिग्दर्शन अनुराग बासू हे करत आहे. 'आशिकी 3' कार्तिक मोठे केस, लांब दाढी अशा लूकमध्ये दिसत आहे. कार्तिकच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. तर काही चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे सांगत आहेत.
'आशिकी 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आशिकी' चित्रपट 1990 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 'आशिकी 2' 2013ला रिलीज झाला. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पाहायला मिळाली. आजही 'आशिकी 2'च्या गाण्यांचे चाहते दिवाने आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.