Cannes Film Festival 2025मध्ये उर्वशी रौतेलाचा हटके अंदाज, 'Parrot Clutch'नं वेधलं लक्ष, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

Urvashi Rautela Cannes Film Festival 2025 Look :'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला एका हटके अंदाजात पाहायला मिळाली. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Urvashi Rautela Cannes Film Festival 2025 Look
Cannes Film Festival 2025SAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच उर्वशी रौतेला 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025' मध्ये (Cannes Film Festival 2025) स्पॉट झाली. कान्स फेस्टीव्हलमधील उर्वशीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

उर्वशी रौतेला लूक

उर्वशी रौतेला रंगीबेरंगी ड्रेसमध्ये स्पॉट झाली. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उर्वशी रौतेलाने आपल्या लूकचा एक व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या हातातील पोपटाच्या डिझाईनच्या पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्वशी रौतेलाने स्ट्रॅपलेस मल्टी कलर डिझायनर गाऊन परिधान केला होता. मोठे कानातले. मोकळे केस आणि डोक्यावर मॅचिंग मुकुट परिधान केला होता. तिच्या आय मेकअपमुळे तिचा लूक खूप खुलून आला होता.

उर्वशी रौतेला Parrot Clutch किंमत?

उर्वशी रौतेलाने परिधान केलेल्या फिशटेल-स्टाईल गाऊनची किंमत जवळपास 4,67,500 रुपये आहे. तर उर्वशीने कॅरी केलेल्या 'पोपट स्टाइल क्लच'ची किंमत 4.68 लाख रुपये आहे. तिच्या या बॅगने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. तर काही लोक तिला ट्रोल देखील करत आहेत.

उर्वशी रौतेलाचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 72.1 मिलियन फॉलोअर्स आहे. तिच्या 'डाकू महाराज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे.

Urvashi Rautela Cannes Film Festival 2025 Look
Shruti Atre : लोकप्रिय अभिनेत्री झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म, पाहा PHOTO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com