Karishma Kapoor Birthday Special Instagram @therealkarismakapoor
मनोरंजन बातम्या

HBD Karishma Kapoor : करिश्मा कपूरला 'लोलो' नाव कसे पडले? खूप रंजक नावामागची कथा

Karishma Kapoor Nickname : करिश्माला 'लोलो' हे नाव कसे पडले ?

Pooja Dange

Karishma Kapoor Birthday Special : करिश्मा कपूर म्हटलं की आठवत तिचं सौंदर्य. घारे डोळे, निरागस चेहरा आणि गोड हास्य. ९० च्या दशकात करिश्माने अनेकांना वेड लावलं होत. वयाच्या १७ व्या वर्षी करियरची सुरुवात करणाऱ्या करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दिल तो पागल है, राजा हिंदुस्तानी, अंदाज अपना-अपना, हम साथ-साथ है हे करिश्माने चित्रपट आजही टीव्हीवर पाहायला मिळतात. लोक आजही तिचे चित्रपट तितकेच आवडीने बघतात. २५ जून १९७४ साली जन्मलेल्या करिश्माचा आज ४९ वा वाढदिवस आहे.

करिश्माच्या अभिनय कारकिर्दीविषयी आपल्याला माहित आहे. परंतु करिश्मा कपूरच्या लोलो या नावाविषयी फार सर्वांनाच माहित आहे असे नाही. चला आज जाणून घेऊया करिश्मा कपूरच्या या नावामागील गुपित. (Latest Entertainment News)

अभिनेत्रींचे फॅन्स तिला तिला करिश्मा या नावाने ओळखतात. पण करिश्माला कुटुंबीय आणि इंडस्ट्रीत 'लोलो' या नावाने हाक मारतात. चला जाणून घेऊया करिश्माला 'लोलो' हे नाव कसे पडले.

रिपोर्ट्सनुसार, करिश्माची आई बबिता कपूर हॉलिवूड अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडाची खूप मोठी फॅन होती. तिच्या नावापासून इंस्पायर होत बबिता कपूर यांनीं मोठी मुलगी करिश्माला 'लोलो' हे निकनेम दिले.

इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी करिश्मा कपूरने केवळ शिक्षण सोडले नाही, तर कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने अभिनय जगतात पाऊल ठेवले. रिपोर्ट्सनुसार, कपूर कुटुंबात मुलींनी इंडस्ट्रीत काम करण्याची प्रथा नव्हती.

पण आई बबिताच्या पाठिंब्याने करिश्माने इंडस्ट्रीत पदार्पण तर केले. तसेच इंडस्ट्रीत स्वतःला सिद्धही केले. करिश्मा कपूरने 1991 मध्ये 'प्रेम कैदी'मधून डेब्यु केला होता.

तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र, या चित्रपटानंतर तिने अनेक फ्लॉप चित्रपट दिले. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला 'राजा हिंदुस्तानी' करिश्मा कपूरच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT