Kareena Kapoor Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor: बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर करीनानेही केली नाराजी व्यक्त, म्हणते 'चित्रपट नसतील तर...'

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही एका कार्यक्रमात बॉलिवूडला करण्यात आलेल्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Kareena Kapoor: २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच वाईट गेले. बॉयकॉट ट्रेंडमुळे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्याचबरोबर आता शाहरुख खानच्या 'पठान'लाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेत्यांना चित्रपटांवर भाष्य करायचे नाही, असे सांगितले. त्याच पार्श्वभुमीवर, आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही कोलकाता येथील एका कार्यक्रमात बॉलिवूडला करण्यात आलेल्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले आहे.

करीना कपूरने रविवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान करीना कपूरने बॉलिवूडमधील बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ती म्हणाली, 'मी याच्याशी अजिबात सहमत नाही. असे झाले तर आम्ही तुमचे मनोरंजन कसे करणार, तुमच्या जीवनात आनंद आणि मजा कशी येईल. तसेच चित्रपटच नसतील तर मनोरंजन कसे होणार.'

करीना कपूर आणि आमिर खानचा गेल्या वर्षी 'लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट ही बॉयकॉट ट्रेंडचा बळी ठरला होता. या चित्रपटाबद्दल करीना म्हणाली, 'हा एक सुंदर चित्रपट आहे आणि मला आणि आमिरला प्रेक्षकांनी एकत्र पाहावे अशी माझी इच्छा होती. अशा परिस्थितीत चित्रपटावर बहिष्कार घालू नका.'

तर आता शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटावरही बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून दीपिकाच्या भगव्या बिकिनीलाही प्रचंड विरोध करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता चित्रपटात बदल करण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला होता. हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT