Kareena Alia SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kareena Alia : आलियाच्या गायनावर 'बेबो'चा कटाक्ष; म्हणाली, 'माहित नाही, तुझा आवाज चांगलाय की नाही'

Kareena Question On Alia Bhatt Singing : करिनाने आलिया भट्टच्या आवाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. करिना आलियाला काय बोली जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. ती अभिनयासोबच एक उत्तम गायिका देखील आहे. आलियाने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटात 'में तेनु समझावां' हे गाण गायिले आहे. तिच्या आवाजावर अनेक चाहते घायाळ होतात. यानंतर आलियाने उडता पंजाबमध्ये दिलजीत दोसांझचे 'इक कुडी जिदा नाम मोहब्बत' हे गाणे देखील गायिले आहे.

एकीकडे चाहते आलियाच्या गाण्यांचे दिवाने आहेत तर दुसरीकडे आलियाची वहिनी म्हणजे करिना कपूर खान (Kareena Kapoor) हिला माहितच नाही की आलिया एवढी सुंदर गाते. मीडिया रिपोर्टनुसार, करिना तिचा शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'च्या (What Women Want) प्रोमोमध्ये आलियाची तिच्या गाण्यावर खिल्ली उडवताना दिसत आहे. त्यावर आलिया बोलते की, "तिला लहानपणापासून गाण्याची आवड आहे." यावर करिना बोलते की, "तुझा आवाज चांगला आहे की नाही हे मला माहीत नाही." यावर उत्तर देत आलिया (Alia Bhatt) म्हणाली, "मी माझ्या बाथरूममध्ये गाणे गाऊ शकते."

अलिकडेच आलियाने 'पुष्पा द राइज' या चित्रपटातील 'ओ अंतवा' हे गाणे गाऊन चाहत्यांना प्रभावित केले आहे. तसेच आलियाने नुकतेच देवरा चित्रपटातील 'चुत्तमल्ले' हे गाणे देखील गायले आहे. ज्युनियर एनटीआरने आलियाचं खूप कौतुक केलं कारण आलियाने हे गाणं तमिळमध्ये गायलं होत. आता आलिया जिगरा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT