Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor Trolled : करीना कपूरच्या 'या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चाहते संतापले

करिना कपूर खानच्या एक वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान(kareena Kapoor) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या बेबो तिच्या 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chadha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खान आणि करिनाच्या चित्रपटाला सोशल मीडियावर बहिष्काराला सामोरे जावे लागले होते, याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला आहे. आता यानंतर करिनाच्या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अलीकडेच, करिनाने गंमतीत म्हटले होते की, तिच्यामुळे भारतीय रेल्वेला आर्थिक फायदा होतो. आता करिनाचा हा जोक तिच्या चांगलाच अंगलट आला आहे.

करीना कपूर खान अलीकडेच तिच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या कॉमेडी शो 'केस तो बना है' मध्ये सहभागी झाली होती. रितेश देशमुख, कुशा कपिला आणि वरुण शर्माच्या या शोमध्ये करिनाने सांगितले की, तिचा 'जब वी मेट' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या कमाईत वाढ झाली आहे. आता करिनाचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बेबोच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक तिला ट्रोल करत आहेत.

करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांचा 'जब वी मेट' हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. इम्तियाज अलीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील करिनाच्या भूमिकेला लोकांनी भरभरून प्रेम दिले. त्याच वेळी, 'जब वी मेट'चे अनेक सीन ट्रेनमध्ये शूट केले गेले जे खूप लोकप्रिय झाले. पण आता, लोक करिनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच तिला या विधानानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

PM Modi - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा PM मोदींसाठी महत्वाचा निरोप; व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण धाडलं

SCROLL FOR NEXT