Rocky Aur Rani Ki Prem Kahani Controversy: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून सध्या चित्रपटातील काही दृश्यांवरून दिग्दर्शकाला ट्रोलर्सने ट्रोल केलंय. प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून प्रेक्षकांनी ट्रेलरवर नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांचा अपमान केला जात असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला. ट्रेलरमधील सीनमध्ये, रणवीर आलियाच्या घरी ३ महिन्यांसाठी राहायला जातो. त्यावेळी आलियाच्या घरात रणवीरला रविंद्रनाथ टागोर यांचा फोटो दिसतो.
रविंद्रनाथ टागोर यांचा फोटो दिसताच, रणवीर आलियाचे आजोबा समजून त्यांना नमस्कार करतो, असा हा सीन आहे. या सीनमध्ये थोडा फार विनोदी अंदाज दाखवला असून नेटकऱ्यांनी रणवीर आणि करण जोहरला ट्रोल केलं आहे. या सीनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मु्द्दा उचलून धरलाय.
ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी नेटकऱ्यांनी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला या सीनवरून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. नेटकरी कमेंट करत म्हणतात, ‘बॉलिवूड भूतकाळातून कधीही शिकू शकत नाही…’ अशी टीका नेटकऱ्यांनी ट्रेलर पाहून केली आहे.
‘रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान करूच कसा शकता? भारताच्या इतिहासात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि अशा व्यक्तीचा अपमान आम्ही सहन करणार नाही..’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी तो सीन पाहून दिल्या आहेत.
चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली असून ट्रेलरमधील रणवीर- आलियाची लव्हस्टोरी पाहून कौतुकही केले आहे. चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार असून करण जोहर तब्बल सात वर्षांच्या कालावधीनंतर तो दिग्दर्शनात पुन्हा पदार्पण केलं आहे.
मुख्य भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट सोबत शबाना आझमी, धर्मेंद्र,जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील या चित्रपटात दिसणार आहे.इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.