Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : कांताराच्या वादळात वरुणचा 'सनी संस्कारी' उडाला, वाचा कोणत्या चित्रपटाने किती केली कमाई

Kantara Chapter 1 vs Sunny Sanskari Ki Tulsi Kumari : सध्या बॉक्स ऑफिसवर 'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हे चित्रपट पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे वीकेंड कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाले.

'कांतारा चॅप्टर 1' हिरो ऋषभ शेट्टी तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' मध्ये मुख्य भूमिकेत वरुण धवन आणि जान्हवी कपूर झळकले आहेत.

'कांतारा चॅप्टर 1' ने कलेक्शनमध्ये 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' ला मागे टाकले आहे.

वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari ) आणि ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये रिलीज झाले आहे. दोन्ही चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाले. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ऋषभ शेट्टीने वरुण धवनला मागे टाकले आहे. 'कांतारा चॅप्टर 1' ने 200 कोटींची कमाई केली आहे. तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाने फक्त 30 कोटी कमावले. चित्रपटांचे चौथ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने चार दिवसांत 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' ने पहिल्या तीन दिवसांत भारतात 162.85 कोटी रुपये कमाई केली. शनिवारी चित्रपटाने सुमारे 55 कोटी रुपये कमाई केली. जी शुक्रवारच्या 46 कोटी रुपयांपेक्षा जवळजवळ 20 टक्के जास्त आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' ने रविवारी 61.00 कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामुळे चित्रपटाची चार दिवसांत कमाई 223.25 कोटी झाली आहे. 'कांतारा चॅप्टर 1' ने आपले बजेट देखील वसूल केले आहे. चित्रपटाचे बजेट 125-130 च्या आसपास होते.

  • दिवस पहिला - 61.85 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 45.4 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 55 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 61 कोटी रुपये

  • एकूण - 223.25 कोटी रुपये

'कांतारा चॅप्टर 1'

'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे. तसेच चित्रपटात मुख्य भूमिकेत देखील ते झळकले आहे. 'कांतारा चॅप्टर 1'चा पहिला भाग 'कांतारा' 2022 मध्ये रिलीज झाला होता. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाने चार दिवसांत 30 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने ओपनिंग डे ला 9.25 कोटी, शुक्रवारी 5.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमाने शनिवारी 7.5 कोटी आणि रविवारी 7.75 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 30 कोटींच्या पुढे गेले आहे.

  • दिवस पहिला - 9.25 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 5.5 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 7.5 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 7.75 कोटी रुपये

  • एकूण - 30.00 कोटी रुपये

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. चित्रपटातील 'बिजुरिया' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT