ऋषभ शेट्टीच्या कांतारा पार्ट २ या चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सतत दुर्दैवी घटना घडत आहेत. १२ जून रोजी चित्रपटातील अभिनेता कलाभवन निजूचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाला होता. आता शूटिंग सुरु असताना चित्रपटाची बोट पाण्यात उलटल्याची दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांतारा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ३० क्रू मेंबर्संना घेऊन जाणारी बोट पाण्यात उलटली. ही घटना कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील मस्तीकट्टे भागात असलेल्या मणी तलावाजवळ घडली आहे. बोटीत ऋषभ शेट्टी देखील होते असे म्हटले जात आहे. बोटीतील सर्वजण सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कांतारा पार्ट १ च्या अभूतपूर्व यशानंतर ऋषभ शेट्टी यांनी कांतारा पार्ट २ चित्रपटाची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मे महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अनुचित घटना घडत आहेत. ३० क्रू मेंबर्स असलेली चित्रपटाची बोट पाण्यात बुडाली. यात जीवितहानी झाली नसली, तरी महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाल्याचे म्हटले जात आहे. पोलीस सध्या अपघातस्थळी चौकशी करत आहेत.
१२ जून रोजी अभिनेता कलाभवन निजू यांचे चित्रपटाच्या सेटवर हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. याआधी मे २०२५ मध्ये अभिनेते राकेश पुजारी यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. राकेश आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेले असताना त्यांना अचानक झटका आला आणि त्यातच त्यांचा प्राण गेला. त्याच महिन्यात, काही दिवसांनी ३२ वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट एम.एफ. कपिल यांचा देखील मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.