Kannappa Movie Akshay kumar Poter  Instagram
मनोरंजन बातम्या

Kannappa Movie: हातात त्रिशूळ, गळ्यात रुद्राक्ष; अक्षय कुमारचा नवा अवतार बघितला का?

Kannappa Movie : कन्नप्पा चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. यामध्ये अक्षयने महादेवची भूमिका साकारली आहे. त्याचे पोस्टरपाहून सोशल मीडियावर अक्षयचे कौतुक होत आहे.

Shruti Vilas Kadam

Kannappa: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान, अक्षयच्या आगामी 'कन्नप्पा' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. या पौराणिक चित्रपटाद्वारे अक्षय टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे, ज्यामध्ये तो भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर कन्नप्पाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये तो भगवान शिवाप्रमाणेच एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू घेऊन उभा दिसत आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आहे. तो खूपच आकर्षक दिसत आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, कन्नप्पा साठी महादेवाच्या पवित्र तेजोमंडलात पाऊल ठेवत आहे. ही महाकथा प्रत्यक्षात आणण्याचा मला फार मोठा सन्मान मिळाला आहे. भगवान शिव या दिव्य प्रवासात मार्गदर्शन करतील. ओम नमः शिवाय! . हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कन्नप्पाची कथा कोणावर आधारित आहे ते जाणून घ्या

कन्नप्पाच्या पोस्टरवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले, मी या चित्रपटाची वाट पाहत आहे. एका युजरने लिहिले की, अक्षय कुमारला या भूमिकेत पाहणे स्वप्न आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, हर हर महादेव. एका वापरकर्त्याने लिहिले, व्वा काय पोस्टर आहे.

कन्नप्पा हा चित्रपट मुकेश कुमार सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हा तेलुगू भाषेतील एक पौराणिक चित्रपट आहे. हा चित्रपट भगवान शिवाचा एकनिष्ठ भक्त कन्नप्पाच्या कथेवर आधारित आहे. अक्षय व्यतिरिक्त विष्णू मंचू देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास, मोहनलाल, काजल अग्रवाल हे कॅमिओ रोलमध्ये दिसतील असे म्हटले जात आहे. हा चित्रपट तेलुगू व्यतिरिक्त हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजीमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT