ColdPlay: 'जय श्री राम' म्हणजे?; क्रिस मार्टिनच्या प्रश्नावर चाहत्यांचे भन्नाट उत्तर, कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल

ColdPlay: मुंबईत कोल्डप्लेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. क्रिस मार्टिनने कॉन्सर्टमधील अनेक सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तो 'जय श्री राम' चा अर्थ विचारताना दिसतो.
Coldplay
ColdplayGoogle
Published On

ColdPlay: कोल्डप्ले हा एक ब्रिटिश रॉक बँड आहे जो १९९७ पासून सक्रिय आहे. या बँडमध्ये गायक क्रिस मार्टिन, बेसिस्ट गाय बेरीमन, विल चॅम्पियन आणि जॉनी बकलँड हे कलाकार आहेत. या बँडचा काल भारतात दुसरा परफॉर्मन्स मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झाला. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील क्रिस मार्टिनने विचारलेल्या 'जय श्री राम' चा अर्थ काय हा व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेष आवडत आहे.

गायक क्रिस मार्टिन कॉन्सर्टमध्ये स्टेजवर नाचत असताना त्याची नजर एका बॅनरवर पडली ज्यावर 'जय श्री राम' असे लिहिलेले होते. क्रिसने ते वाचले आणि त्याच्या प्रेक्षकांना 'जय श्री राम' चा अर्थ विचारला. त्याच्या प्रश्नावर चाहत्यांनी जोरात जय श्री रामची घोषणा केली हे ऐकून क्रिस थक्क झाला. त्यानंतर त्यांनी 'जय श्री राम' अशी घोषणा केली.

Coldplay
Emergency Vs Azaad Box Office Collection Day 2 : कंगनाच्या समोर राशा-अमनचा जादू फैल; 'इमर्जन्सी' दुसऱ्या दिवशीही 'आझाद'च्या पुढे!

क्रिस मार्टिन कॉन्सर्ट

या संगीत कार्यक्रमादरम्यान, बँडने 'फिक्स यू' आणि 'अ स्काय फुल ऑफ स्टार्स' यासह त्यांची अनेक प्रसिद्ध गाणी सादर केली. दरम्यान, कॉन्सर्टमध्ये आणखी एक मजेदार क्षण घडला. जेव्हा क्रिसने कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव घेत घोषणा केली. त्यानंतर, क्रिसने बुमराहचे कौतुक करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.

Coldplay
Bigg Boss 18: २ कोटी दंड आणि...; बिग बॉसचे घर मध्येच सोडल्यास मिळणारी 'ही' मोठी शिक्षा!

बुमराहचा उल्लेख करत म्हणाला

क्रिस म्हणाला, 'थांबा, आपल्याला शो संपवावा लागेल कारण जसप्रीत बुमराहला बॅकस्टेजला येऊन खेळायचे आहे. त्याला आता माझ्यासमोर गोलंदाजी करायची आहे. सर्वांना शुभ रात्री. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आम्हाला मुंबईत येऊन खूप आनंद होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com