
Salman Khan: बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉस 18 ची ट्रॉफी करणवीर मेहराने आपल्या नावावर केली आहे. तर, विवियन डिसेना या शोचा उपविजेता ठरला आहे. या शोमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत खूप मजा करताना दिसला आहे. सलमानने कशिश कपूरची खूप मस्करी देखील केली. पण शो दरम्यान, सलमानने पुढील सीझन होस्ट करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
सलमान खान बिग बॉसच्या पुढील सीझनचे होस्टिंग करणार नाही
सलमान खानने गमतीने म्हटले की अंतिम फेरीतील स्पर्धकांना असे वाटेल की ते खूप पुढे आले आहेत आणि आता त्यांच्या जिंकण्या आणि हरण्याने काही फरक पडत नाही. पण हे चूक असून तुम्ही जास्त पुढे नाही आलात. सलमानचे हे बोलणे ऐकून सगळे प्रेक्षक हसायला लागले.
सलमान खानने जुन्या स्पर्धकासोबत मजा केली
संवाद पुढे चालू ठेवत सलमान खान म्हणाला, "मला खूप आनंद आहे की आज स्टेजवर येण्याचा शेवटचा दिवस आहे, मी हा सिझन संपण्याची वाट पाहत आहे." त्यानंतर त्याने शोच्या जुन्या स्पर्धकांशीही चर्चा केली. सलमानने सर्वांना विचारले की कोणता स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये स्थान मिळविण्यास पात्र नाही. श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर आणि चाहत पांडे यांनी ईशा सिंगचे नाव घेतले. तर, करण वीर मेहराने सांगितले की, बाहेर पडलेल्या स्पर्धकांमध्ये, चाहत पांडे लवकर स्पर्धेतून आऊट झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.