Guruprasad Passed Away Saam tv
मनोरंजन बातम्या

Guruprasad Passed Away : प्रसिद्ध दिग्दर्शकाने संपवलं जीवन; राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Guruprasad Death : प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी राहत्या घरी जीवन संपवलं आहे. त्यांचा राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कन्नडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

५२ वर्षीय कन्नडचे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवलं. गुरुप्रसाद यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गुरुप्रसाद यांच्या जाण्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा झटका बसला आहे.

सिनेसृष्टीवर शोककळा

मीडिया रिपोर्टनुसार, कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला. कर्नाटकातील मदनैयाकहल्ली भागातील त्यांच्या घरात गुरुप्रसाद यांचा मृतदेह सापडला. गुरुप्रसाद मागील ८ महिन्यांपासून त्या घरात राहत होते. दिग्दर्शकांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरातून दुर्गंध येत होता. यामुळे त्यांच्या शेजारी लोकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस तपासात घरात कुजलेल्या अवस्थेत गुरुप्रसाद यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

राहत्या घरात आढळला मृतदेह

पोलीस दिग्दर्शक गुरुप्रसाद यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांचं म्हणणं आहे की, 'गुरुप्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच जीवन संपवलं. त्यांचा मृतदेह सडण्यास सुरुवात सुरु झाला होता. गुरुप्रसाद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास करण्यात येत आहे. गुरुप्रसाद हे कर्जात बुडाले होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी जीवन का संपवलं, याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. त्यांचे काही चित्रपट फ्लॉप गेल्याने ते आर्थिक अडचणीत सापडल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे त्यांनी जीवन संपवलं आहे. गुरुप्रसाद यांनी २००६ साली दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT