Kanika Mann Weight Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanika Mann Weight : टीव्ही अभिनेत्रीचं वजन फक्त २५ किलो, नेटकऱ्यांच्या मनातही शंका

Kanika Mann Weight : 'गुड्डन-तुमसे ना हो पाएगा' फेम अभिनेत्री कनिका मान हिने सोशल मीडियावर विशेष चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या ती तिच्या वजनामुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

'गुड्डन-तुमसे ना हो पाएगा' फेम अभिनेत्री कनिका मान हिने सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याच्या जोरावर विशेष चाहतावर्ग निर्माण केला आहे. कायमच कनिकाच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा होते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असते. अलिकडेच कनिकाने एक इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिने तिचं वजन चाहत्यांना दाखवलं आहे. तिच्या वजनामुळे नेटकऱ्यांनी तिच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

शेअर केलेल्या पोस्टमुळे कनिका मानच्या चाहत्यांमध्ये तिच्या वजनाची जोरदार चर्चा होत आहे. पोस्टमध्ये कनिकाने तिचं २५ किलो वजन असल्याचं स्पष्ट केलं आहे. तिचं फक्त २५.७ किलो वजन असल्यामुळे चाहत्यांसह नेटकऱ्यांना आणि तिच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. नेटिझन्ससह सर्वांनीच तिच्या पोस्टवर कमेंट्स करत स्वत:ला इतकं मेन्टेन कसं ठेवलं आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. सध्या तिची इन्स्टा पोस्ट व्हायरल होत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

कनिका मानने गेल्या काही दिवसांपूर्वीच हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तिने डिजीटल वजन काट्यावर वजन केलेले दिसत आहे. तिचं वजन पाहून अनेक युजर्सने तिला फिटनेसबद्दल प्रश्न विचारले आहेत. या फोटोमुळे नेटकरी खूप मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एकाने विचारलं की, "फक्त २५ किलो वजन कसं काय शक्य ?", "हा वजन काटा तु ऑनलाईन ॲपवरून खरेदी केलाय का ? ", "इतकं वजन मेन्टेन ठेवण्यासाठी तु कोणत्या टीप्स फॉलो करतेस" सह अशा वेगवेगळ्या मिश्किल टीप्पणी तिला नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. सध्या कनिका मानच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

कनिका मानबद्दल सांगायचं तर, अभिनेत्री 'गुड्डन-तुमसे ना हो पायेगा', 'रुहनियत' आणि 'बधो बहू'सह अनेक फेमस टीव्ही सीरियल्सची ती भाग आहे. तिने 'रॉकी मेंटल', 'दाना पानी', 'शूटर' आणि 'बृहस्पती' यासह अनेत चित्रपटांत मुख्य भूमिका साकारली. याशिवाय कनिका मान रोहित शेट्टीचा फेमस रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसली होती. 'चांद जलने लगा' या टीव्ही सीरियलमधून कानिका फेमस झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा,युरियासाठी शेतकऱ्यांच्या खत विक्री केंद्रावर रांगा

Mumbai Fire: झोपडपट्टीला भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक|VIDEO

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू ; वयाच्या ४० व्या वर्षी निधन,संगीत विश्वात शोककळा पसरली

SCROLL FOR NEXT