Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: थेट अमिताभ बच्चन यांच्यावरच भडकली कंगना; चित्रपट फ्लॉप होण्याच्या भीतीने सडकून टीका

'इमर्जन्सी' आणि 'गणपत' या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची एकच तारीख असल्यानं कंगनाने 'गणपत' चित्रपटाच्या निर्मात्यांवर सडकून टीका केली आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपला आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. कालच अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांची दमदार स्टार कास्ट असलेला 'गणपत' (Ganpath)चा पहिला टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची एकच तारीख असल्याने कंगनाने बुधवारी संध्याकाळी 'गणपत' चित्रपटाच्या निर्मात्यांवर बरीच टीका केली आहे. कंगनाचा 'इमर्जन्सी' आणि टायगरचा 'गणपत' २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

कंगनाने 'गणपत'च्या निर्मात्यांवर ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत, "संपूर्ण ऑक्टोबर महिना मोकळा असताना 'गणपत' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख २० ऑक्टोबरंच का निवडली? सोबतच सप्टेंबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिना देखील संपूर्ण फ्री आहे. मी माझ्या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनादरम्यानच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहे." असं म्हणंत कंगनाने बुधवारी संध्याकाळी ट्वीट केले आहे.

त्यानंतर तिने पुन्हा आणखी एक ट्वीट केले आहे, कंगना तिच्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, 'आता मी ट्रेलरसोबत एक महिना अगोदर 'इमर्जन्सी'च्या रिलीजची तारीख जाहीर करेन. जर संपूर्ण वर्षात एकही चित्रपट प्रदर्शित होत नसून चित्रपटाची तारीख एकच का जाहीर केलीत? ही सध्या आपल्या चित्रपटसृष्टीची अवस्था आहे. तुम्ही सगळे काय खातात, तुम्ही इतके आत्मघाती कसे आहात?" असं म्हणत पुन्हा चित्रपट निर्मात्यांना बरेच खडेबोल सुनावले आहे.

कंगना रणौतने 2021 साली 'आणीबाणी' चित्रपटाची घोषणा केली होती. तिचा हा नवा आगामी चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा असून इंदिरा गांधींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात कंगनाने दिग्दर्शिका आणि निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात कंगनासोबत अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांच्या भूमिका आहेत.

'गणपत'मध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

Pune : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT