Kanak Rele: शास्त्रीय नृत्यंगना डॉ. कनक रेळे यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा...

डॉ. कनक रेळे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी मुंबईत निधन.
Kanak Rele Passes Away
Kanak Rele Passes Away Saam TV
Published On

Kanak Rele Passed Away: शास्त्रीय नृत्यातील दिग्गज नृत्यांगना कनक रेळे यांचे काल २२ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षी कनक यांचे मुंबईत निधन झाले. मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारासाठी कनक यांना केरळ सरकारचा पहिला गुरु गोपीनाथ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

1937 मध्ये शिवदास आणि माधुरी यांच्या पोटी जन्मलेल्या डॉ. कनक रेळे यांचे बालपण पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतनमध्ये गेले. वयाच्या सातव्या वर्षी, डॉ. रेळे यांना गुरु करुणाकर पणिकर यांच्याकडून कथकलीची दीक्षा त्यांना मिळाली.

Kanak Rele Passes Away
Ram Charan Interview: अमेरिकाही राम चरणच्या बाळासाठी आतुर; भर कार्यक्रमात अभिनेत्याने डॉक्टरांकडे मागितली मदत

गुजरातमध्ये जन्मलेल्या कनकने अनेक अडथळे पार करत पुरुषप्रधान कथकलीच्या जगात प्रवेश केला होता. तिच्या प्रशिक्षणादरम्यान, वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या पायांना वेदना सुरू झाल्या तेव्हा त्यांना पोलिओ असल्याचे निदान झाले. परंतु त्यांनी नृत्याच्या सरावाने त्यावर मात केली.

1973 मध्ये, डॉ. रेळे यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्न नालंदा नृत्य कला महाविद्यालयाची स्थापना केली. 2022 मध्ये, डॉ. रेळे यांनी - मी आणि माय मोहिनीअट्टम हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ. रेळे यांनी 1977 मध्ये भारतातील पहिली नृत्यातील पीएच.डी मिळवून स्वत:साठी आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधाचे शीर्षक होते, 'मोहिनीअट्टम: सर्व पैलू आणि प्रभावाचे क्षेत्र'. 2013 मध्ये डॉ.रेळे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही डॉ. कनक रेळे यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, आपल्या सर्वांसाठी, विशेषत: माझ्यासाठी एक दुःखद दिवस आणि आपले एका खासव्यक्तीला गमावले आहे. आमच्यात एक प्रेम आणि परस्पर आदर होता.

पद्मविभूषण डॉ. श्रीमती. कनक रेळे, अट्टम नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक आणि नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापक यांचे निधन झाले आहे. यांच्या निधनाने शास्त्रीय नृत्याच्या जगतातील एका महान युगाचा अंत झाला. या जगासाठीचे त्यांचे योगदान खूपच मोठे आहे. कनकजींचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व चिरंतन आहे.

त्यांच्या कुटुंबास आणि नालंदामधील सदस्यांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना. आमची मैत्री सदैव माझ्या स्मरणात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com