Alia Bhatt: कलाकारांच्या खासगी आयुष्यात पापाराझींना डोकवणं पडलं महागात, आलियाची मुंबई पोलिसांत धाव

नुकताच आलियाने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Alia Bhatt Latest News
Alia Bhatt Latest News Instagram
Published On

Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच आलियाने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. आलियाच्या घरासमोरील इमारतीतील गच्चीवरुन गुपचूप फोटो काढणाऱ्या नराधमावर संताप व्यक्त केला आहे. तिच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने हा गंभीर प्रकार शेअर केला आहे. या प्रकारावर आलियाला अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे.

Alia Bhatt Latest News
Kanak Rele: शास्त्रीय नृत्यंगना डॉ. कनक रेळे यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा...

आलिया भट्ट तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोनजण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला आहे. सोबतच आलियाने फोटो पोस्ट करताना मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तिच्यासोबत संपर्क ही साधला आहे.

Alia Bhatt Latest News
Rakhi Sawant: राखीने आदिलच्या आरोपांची केली पोलखोल, माध्यमांसमोरच वाचली आरोपांची भली मोठी यादी
Alia Bhatt Status
Alia Bhatt Status Instagram

“मुंबई पोलिसांनी आलिया भट्टसोबत संपर्क साधला असून अशाप्रकारे फोटो काढणाऱ्याची तक्रार दाखल करायला सांगितले आहे. याबरोबर ज्या ऑनलाईन साईटवर हे फोटो प्रकाशित करण्यात आले, त्यांच्या विरोधातही तक्रार करा, असे पोलिसांनी आलियाला सांगितले. यानंतर आलिया भट्टच्या पीआर टीमने, आम्ही त्या ऑनलाईन साईटच्या संपर्कात आहोत” असे पोलिसांना सांगितले आहे.

Alia Bhatt Latest News
Ram Charan Interview: अमेरिकाही राम चरणच्या बाळासाठी आतुर; भर कार्यक्रमात अभिनेत्याने डॉक्टरांकडे मागितली मदत

शेअर केलेल्या पोस्टमध्ये आलिया म्हणते, 'तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे?' असा सवाल यावेळी आलियाने त्या फोटोग्राफरला विचारला आहे.

तर पुढे आलिया म्हणते, 'एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. पण आज मला हे म्हणावं लागतंय की तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात, अशी पोस्ट आलियाने केली होती.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com