Kangana Ranaut On Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे संवाद, व्हिएफएक्स, सेलिब्रिटी लूक, चित्रपटाची कथा यावरून अनेक वाद झाले. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. ॲडव्हान्स बुकिंग दमदार झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जरी चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असली तरी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच या चित्रपटासंबंधित कंगना रनौतनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाची पोस्ट पाहून तिने ‘आदिपुरुष’वर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. तिने कोणाचेही नाव न घेता टोमणा मारल्याचे दिसून येत आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रभू रामाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राम-सीता आणि हनुमान देखील दिसत आहेत.
हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने ‘राम का नाम बदनाम ना करो’ हे गाणं लावून पोस्ट शेअर केली आहे. हे गाणे १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या म्युझिकल ड्रामा चित्रपटातील आहे. चित्रपटाची निर्मिती देव आनंद यांनी केली असून त्यांनी त्या चित्रपटात अभिनयही केला होता.
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर टोमणा मारताना कोणाचच नाव जरी नसलं घेतलं तरी, तिने नकळतपणे प्रभासलाच टार्गेट करत, ट्रोल केल्याचे दिसत आहे. कंगनाची ही स्टोरीपाहून ते स्पष्टपणे दिसून येते.
नेटकऱ्यांनी मात्र यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. कंगना साऊथच्या लोकांना घाबरते, तर अनेक जण म्हणतात, आता कंगनाही चित्रपटाची खिल्ली उडवत आहे. एक युजर म्हणतो, कंगना अशी नाही, पण जेव्हा ती कोणाला टार्गेट करते, तेव्हा ती त्याला नावाने टॅग करते. तर कोणी म्हणतं ही कंगनाची स्टाईल आहे.
चित्रपट पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील राम, सीता, रावण आणि हनुमान या पात्रांचा समावेश असलेली कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची किंवा दुरुस्त करण्याचे निर्देश चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
आदिपुरुष चित्रपट १६ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने एकाच दिवसात ९५ कोटींची छप्पर फाडके कमाई केली आहे. तर जगभरात चित्रपटाने १२५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.