Sunny Leone In Bigg Boss OTT 2: सलमानसोबत दिसणार सनी लियोनी? व्हिडीओ शेअर करत म्हणते...

Sunny Leone Appear On Bigg Boss OTT 2: सनी लियोनी बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची सध्या चर्चा आहे.
Sunny Leone In Bigg Boss OTT 2
Sunny Leone In Bigg Boss OTT 2Saam Tv
Published On

Sunny Leone Set To Appear On Salman Khan’s Bigg Boss OTT 2: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘बिग बॉस ओटीटी २’ येणार आहे. आज पासून (१७ जून) हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अशातच हा शो पासून सुरू होणार असल्याने प्रेक्षक या शो करिता फारच उत्सुक आहेत. कोणते स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार या करिता सर्वच उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर सनी लियोनी येणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या एन्ट्रीबद्दल तिने खुलासा केला.

Sunny Leone In Bigg Boss OTT 2
Saif Ali Khan Trolled: निर्मात्यांचा प्रयत्न सपशेल अपयशी, रावणाचा लूक बदलूनही होतोय तुफान ट्रोल...

सनी लियोनी यापूर्वी बिग बॉस हिंदीच्या पाचव्या सीझनमध्ये आली होती. २०११ मध्ये बिग बॉस हिंदीमध्ये एंट्री केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. आता पुन्हा एकदा सनी लियोनी बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चाहते तिच्या एंट्रीमुळे भलतेच खुश आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या एंट्रीची चर्चा सुरू आहे. अखेर तिने त्यामागील सत्य उघड केले आहे.

सनीने सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत तिने तिच्या एंट्रीबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. सनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणते, “बिग बॉसच्या घरात येणे म्हणजे आपल्या दुसऱ्या घरात येण्यासारखे आहे. या शोसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. माझ्या करियरची खरी सुरुवात बिग बॉसच्या घरातूनच झाली. या शो मधूनच मी खरं तर बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. त्यामुळे या शोमध्ये मला परत यायला मिळत आहे, यासाठी मी खूपच उत्साहीत आहे. परंतु, यंदा मी स्पर्धक म्हणून येणार नसून मी कशासाठी येणार आहे हे तुम्ही ओळखा…”

Sunny Leone In Bigg Boss OTT 2
Adipurush 1st Day Collection : पहिल्याच दिवशी ‘आदिपुरुष’ हाऊसफुल्ल, इव्हनिंग- नाईट शोसाठी प्रेक्षकांची झुंबड...

सनी लिओनी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सलमान खानबरोबर शो होस्ट करणार आहे. सोबतच या शोच्या ओपनिंग कार्यक्रमला येणार की, काही भागांमध्ये हजेरी लावून स्पर्धकांना टास्क देण्यासाठी येणार याचा लवकरच खुलासा होईल. बिग बॉसच्या घरात सनीचा नेमका रोल काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी २’ प्रेक्षकांना जिओ सिनेमा आणि व्हूट सिलेक्टवर विनामूल्य पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com