Kangana Ranaut Pathaan Film News  saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगनाचा 'पठान' चित्रपटावरुन यु- टर्न, म्हणते '...यह गुंजेगा सिर्फ जय श्री राम'

नुकतेच बुधवारी कंगनाने 'पठाणसारखे चित्रपट नक्कीच चालले पाहिजे' असे म्हटल्यानंतर कंगनाने आता यू-टर्न घेतला आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. सर्वजण शाहरुखच्या दमदार अ‍ॅक्शन आणि चित्रपटाच्या कथेचे कौतुक करत आहेत. चित्रपट निर्माता करण जोहरने 'पठान'च्या रेकॉर्डब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रतिक्रिया देत सांगितले की 'प्रेम नेहमी द्वेषावर मात करते.' सोबतच आता कंगनानेही 'पठान' चित्रपटावर आपले मत स्पष्ट केले.

सध्या चित्रपटाने बॉयकॉट आणि विरोधाचा सामना केल्यानंतर'बेशरम रंग' गाण्यामुळे चित्रपटगृहात चित्रपट चांगलाच चालत आहे. नुकतेच बुधवारी कंगनाने 'पठाणसारखे चित्रपट नक्कीच चालले पाहिजे' असे म्हटल्यानंतर कंगनाने आता यू-टर्न घेतला आहे. कारण चित्रपटात शत्रू देश असलेल्या पाकिस्तानाला चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे.

अलीकडेच कंगना ट्वीटरवर पुन्हा एकदा जोमात परतली आहे, पठानला विरोध करणं हाच त्याचा मोठा विजय असल्याचा दावा करणाऱ्यांना संबोधित केले. "पठान" बद्दल "भारताचे प्रेम आणि सर्वसमावेशकता" चित्रपट थिएटरमध्ये "यशस्वीपणे" चालू आहे.

नुकतेच केलेल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, 'पठानच्या विरोधावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्यांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर कोणाचे प्रेम? 80 टक्के हिंदू राहतात आणि तरीही आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS यांना प्रकाशझोतात आणणारा 'पठान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. द्वेष आणि निर्णयाच्या पलीकडे असलेली ही भारताची भावना, त्याला महान बनवते. भारताच्या प्रेमानेच शत्रूंच्या द्वेष आणि विचित्र राजकारणावर विजय मिळवला आहे. पण आशा ठेवणाऱ्यांनी कृपया लक्षात घ्या... पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो... 'गुंजेगा तो यहाँ सिर्फ जय श्री राम... जय श्री राम.''

बुधवारी करण जोहरने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, 'एका दिवसात १०० कोटी, एका दिवसात 100 कोटींपेक्षा अधिकची कमाई. नेहमीच ग्रेट असणारा मेगा स्टार शाहरुख, दूरदर्शी आणि महान YRF आणि आदित्य चोप्रा,सिद्धार्थ आनंद, दीपिका, जॉन !!! व्वा. प्रेम नेहमी द्वेषाला हरवते! आजच चित्रपट पाहायला जा.'

शाहरुख खानचा 'पठान' बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडित काढत आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाल्यानंतर या अॅक्शन चित्रपटाने जगभरात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुख, दीपिका, जॉनसोबत या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat Bridge Collapse Update : गुजरात पूल दुर्घटनेत मोठी अपडेट; चार अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांचा आकडा १८वर

Shanaya Kapoor : 'आंखों की गुस्ताखियां' चित्रपटात झळकणारी शनाया कपूर नक्की आहे कोण?

Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT