Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा...

मात्र न्यायालयाने जॅकलिनला दुबईला जाण्यासाठी तिने सांगितलेल्या कारणांचा विचार करत तिला सशर्त परवानगी दिली आहे.
Jacqueline Fernandez
Jacqueline FernandezSaam Tv

Money laundering case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकतेच न्यायालयात तिच्या एका याचिकेवर सुनावणी पार पडली. जॅकलिनने दुबईला जाण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती, त्याला ईडीने कोर्टात विरोध केला होता. मात्र न्यायालयाने जॅकलिनला दुबईला जाण्यासाठी तिने सांगितलेल्या कारणांचा विचार करत तिला सशर्त परवानगी दिली आहे.

Jacqueline Fernandez
Pathan World Wide Collection: शाहरुखच्या 'पठान' राखली बॉलिवूडची लाज, दोन दिवसात जगभरात कमावले कोट्यवधी

ईडीने न्यायालयासमोर पुढे सांगितले की, जॅकलिन फर्नांडिसने 28 ते 30 जानेवारी या कालावधीत दुबईला जाण्यासाठी पुन्हा परवानगी मागितली आहे. पेप्सिकोच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जॅकलीनने ही याचिका दाखल केली आहे. पण तिला दुबईला जाऊ देऊ नये, असे ईडीचे म्हणणे आहे, कारण तेथेही गुन्हा घडला असून त्याचा तपास सुरू आहे.

ईडीने न्यायालयासमोर युक्तिवाद करत निर्णय दिला की, मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या भूमिकेचा तपास सध्या गंभीर टप्प्यावर आहे. त्यामुळे तिला परदेशात जाण्याची परवानगी देऊ नये. ईडीच्या युक्तिवादावर जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार आईला भेटण्यासाठी दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आली आहे.

Jacqueline Fernandez
Pathaan Movie: चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनाही 'पठान'ची भुरळ, सोशल मीडियावर पोस्ट करत केले तोंडभरून कौतुक

जॅकलिन फर्नांडिसचे वकील पुढे म्हणाले, “आम्हाला माहित आहे की तपास एका गंभीर टप्प्यावर आहे. आत्तापर्यंत कोर्टाने ज्या काही अटी घातल्या आहेत त्या आम्ही पाळल्या आहेत. जॅकलिनला कालच ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. तिला दुबईला जाऊ दिले नाही तर त्याचा थेट परिणाम ऑस्करवरही होणार आहे.”

जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाने सांगितले की, जर दुबईला जाण्याची परवानगी मिळाली नाही तर तिच्या आणि पेप्सिकोमधील करारावर परिणाम होईल. या युक्तिवादांवर ईडीने सांगितले की, “जॅकलिन फर्नांडिसला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. चांगली गोष्ट आहे, पण ऑस्करचा कार्यक्रम दुबईत नव्हे तर लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. म्हणूनच दुबईला जाण्याची परवानगी देऊ नये.”

Jacqueline Fernandez
Pathaan: शाहरुखच्या पठानने काश्मिरमध्ये तोडला ३२ वर्षांचा 'हा' विक्रम, चित्रपटगृहात साजरी केली दिवाळी...

निकाल सुनावताना मीडिया कोर्ट रुमच्या बाहेर होती. मात्र जॅकलिनच्या बाजूने निकाल लागला. न्यायालयाने जॅकलिनला दुबईला जाण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. जॅकलिन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की, जॅकलीन फर्नांडिसला 28 ते 30 जानेवारी या कालावधीत परदेशात काही व्यावसायिक कारणांमुळे जाण्याची परवानगी मागितली होती. तिला त्या कार्यक्रमात डान्स देखील सादर करायचा आहे, ज्याला ईडी सतत विरोध करत होती.

Jacqueline Fernandez
Malaika Arora: मलायका आणि अरबाज पुन्हा एकत्र, कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केले तोंडभरुन कौतुक...

जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील पुढे म्हणतात, “आम्ही कोर्टात सांगितले होते की, कोर्टात होत असलेल्या प्रत्येक सुनावणीला जॅकलीन नेहमी हजर राहते. पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. 1 कोटींच्या मुदत ठेवीशिवाय काही अटींवर जॅकलिनला दुबईला जाण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com