Kangana Ranaut News  saam tv
मनोरंजन बातम्या

'ही' अभिनेत्री लहानपणापासूनच दिसतेय इंदिरा गांधींसारखी... कंगना रणौतने फोटो शेअर करत केला खुलासा

कंगना रणौतने सोशल मीडियावर चित्रपटात साकारत असलेल्या व्यक्तिरेखेवर मत व्यक्त केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूड क्वीन कंगना राणौत (kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील लूक आणि चित्रपटाचा टिझर समोर आला. ज्याने चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. यासह निर्मात्यानी चित्रपटातील अन्य पात्राचे लूकदेखील रिलीज केले आहेत. आता अभिनेत्री कंगना रणौतने चित्रपटात साकारत असलेल्या व्यक्तिरेखेवर मत व्यक्त केले आहे.

कंगना रणौत सोशल मीडियावर (Social Media)कायम सक्रिय असते. फोटो व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्याच्या संपर्कात राहणाऱ्या कंगनाने नुकताच फोटो शेअर केला आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर बालपणातील फोटो शेअर करत खळबळजनक मत मांडले आहे. फोटोमध्ये कंगना शाळेच्या गणवेशामध्ये दिसत आहे. तिचे केस लहान आहेत. कंगनाने पोस्ट शेअर करत, लहानपणी माझे अनेक नातेवाईक मला इंदिरा गांधी म्हणायचे, कारण माझे केस इंदिरा गांधींसारखे होते. #emergency असा कॅप्शन दिला आहे.

कंगानाने म्हणतेय की, ती लहानपणापासून इंदिरा गांधींसारखी दिसत होती.तिच्या केसांच्या स्टाईलमुळे तिचे बरेच नातेवाईक तिला इंदिरा गांधी म्हणून हाक मारत असे. तिने लहानपणी कोणाचीही हेअरस्टाईल फॉलो केली नाही. गावाकडच्या एखाद्या न्हावीकडे जाऊन आवडीचे केस कापायची.असं म्हटलं आहे. कंगनाला लहानपणी लहान केस ठेवायलाच आवडायचे आणि यामुळे तिचे काका देखील तिला इंदिरा गांधी म्हणायचे. असे तिने म्हटलं आहे.

सध्या कंगना तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाची कथा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. 'इमर्जन्सी' हा कंगना रणौतच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचा पहिला चित्रपट आहे. इमर्जन्सीमध्ये अभिनयासोबतच कंगना स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहे. चित्रपटात कंगना राणौत हुबेहूब माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसत आहे. त्याचबरोबर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांची भूमिका श्रेयस तळपदे साकारणार असून, कॅन्सरमधून बरी झालेली महिमा चौधरी पुपुल जयकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT