Kamal Hasan In Project K Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kamal Hasan In Project K: ‘प्रोजेक्ट के’ मध्ये कमल हसनची एंट्री, प्रभास - कमल हसन - बिग बी पहिल्यांदाच आमनेसामने

Kamal Hasan New Film: अभिनेता कमल हसन यांची ‘प्रोजेक्ट के’मध्ये एन्ट्री होणार आहे.

Chetan Bodke

Kamal Hasan News: प्रभास सध्या ‘आदिपुरूष’ चित्रपटामुळे चर्चेत असून हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित आहे. सोबतच प्रभासच्या लवकरच बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाची शूटिंग ही सुरू होणार आहे. या सायन्स फिक्शन आणि ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिग्गज सेलिब्रिटी दिसणार आहेत. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता कमल हसन चित्रपटात दिसणार आहे,

‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभाससोबत अभिनेता कमल हसन टक्कर देताना दिसणार आहे. चित्रपटात कमल हसन खलनायकाची भूमिका साकारणार आहे. कमल हसन यांना ‘प्रोजेक्ट के’ची कथा, तिची थीम आणि भूमिका पसंदीस उतरले आहे. कमल हसनने या चित्रपटासाठी होकार दिलाय.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, कमल हसन सध्या त्यांच्या इतर चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहेत. ते सर्व शूट्स आटोपून कमल हसन लवकरच ‘प्रोजेक्ट के’ ची शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. प्लॅनिंग प्रमाणे जर सर्व गोष्टी झाल्यातर, कमल हसन ऑगस्टच्या सुरुवातीलाच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.

‘प्रोजेक्ट के’मध्ये कमल हसन कोणत्या भूमिकेत असतील? किंवा चित्रपटाचं शूटिंग स्पॉट अद्याप जाहीर केलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाग अश्विनच्या चित्रपटात कमल हसन पूर्णपणे अनोख्या अवतारात दिसणार आहे. त्याचे पात्र निगेटिव्ह आहे.

कमल हसनने ‘प्रोजेक्ट के’साठी १५० कोटी रुपये इतकी फी घेतल्याचे बोलले जात होते. निर्मात्यांकडून या संबंधित अद्याप माहिती दिलेली नाही, परंतु कमल हसन यांना या चित्रपटासाठी तगडं मानधन मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटाची टीम आता कमल हसनबाबत लवकरच मोठी घोषणा करणार आहे. (Entertainment News)

‘प्रोजेक्ट के’ चित्रपट तेलगू आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकत्र शूट करणार आहे. या चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी देखील दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट के’चे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे जवळपास ७० टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT