22 Year Old Gadar Re-Released: सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा गदर २ या चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तर त्यापूर्वी निर्मात्यांनी 22 वर्षांपूर्वी झालेला 'गदर एक प्रेम कथा' चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला. त्यामुळे नवीन येणाऱ्या गदरसाठी प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता अधिक वाढेल.
2001 मध्ये गदर एक प्रेम कथा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचे ग्राफिक्स 4K वर अपडेट केले. तर हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होत आहे. गदर पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांच्या निर्णय यशस्वी झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करत आहेत. (Latest Entertainment News)
गदर एक प्रेम कथा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 9 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने 5 दिवसांत चांगला गल्ला जमवला आहे. गदरने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 30 लाखांची कमाई केली.
तर दुसऱ्या दिवशी 45 लाख आणि तिसऱ्या दिवशी 55 लाखांचे कलेक्शन केले. यासह गदर एक प्रेम कथाने ओपनिंग (पहिल्या) वीकेंडला 1.30 कोटींचे कलेक्शन केले आहे.
रि-रिलीजच्या झालेल्या गदर एक प्रेम कथा या चित्रपटाने या आवठड्याच्या पहिल्या तीन दिवसात किती कलेक्शन केले ते पाहूया. सोमवारी या चित्रपटाने 30 लाखांची कमाई केली. तर मंगळवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाल्याचे दिसून आले.
बॉलीवूड मूव्ही रिव्ह्यूजच्या वृत्तानुसार, गदरने १३ जून रोजी २३ लाख नेट जमा केले. तर काळ म्हणजे बुधवारी या चित्रपटाचे कलेक्शन अजून कमी झाले. या चित्रपटाने काल २१ लाखांची कमाई केली आहे.
सनी देओलचा धमाकेदार अवतार लवकरच पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. Gadar 2 चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात म्हणजे 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी चित्रपटातील अभिनेता लीड तारा सिंग त्याच्या मुलासाठी पाकिस्तानला जाणार आहे.
चित्रपटात त्याच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने केली आहे, ज्याने जुन्या गदरमध्ये तारा सिंगच्या मुलाची भूमिका केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.