Devendra Fadnavis wishes Adipurush Team: देवेंद्र फडणवीसांनी ‘आदिपुरूष’ च्या टीमसाठी केले खास ट्वीट, म्हणाले - ‘आदिपुरुष प्रभू श्रीराम…!’

Devendra Fadnavis Watch Adipurush Trailer: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिपुरूष चित्रपटाला मिळत असलेल्या यशासंबंधित काही ट्वीट केले आहे.
Devendra Fadnavis wishes Adipurush Team
Devendra Fadnavis wishes Adipurush TeamTwitter
Published On

Maharashtra Deputy CM wishes Adipurush Team: येत्या १६ जून रोजी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे. नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिपुरूष चित्रपटाला मिळत असलेल्या यशासंबंधित काही ट्वीट केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूड चित्रपटाला मिळत असलेल्या यशानिमित्त ट्वीट केलं होतं. त्यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी ‘द केरला स्टोरी’ संबंधितही आपली ठोस बाजू मांडली होती. अशातच त्यांनी ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या यशासाठी ट्वीट करताना देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis wishes Adipurush Team
Megha Dhade Joins BJP: बिग बॉस फेम मेघा धाडेची नवी इनिंग, अभिनयानंतर आता राजकारणात एन्ट्री

त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर केले की, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर आदिपुरुष प्रभू श्रीराम यांची कृपा व्हावी ही प्रार्थना. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा!” अशा आशयाचं ट्वीट करत त्यात मनोज मुंतशीर यांना टॅग करत ट्वीट शेअर केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये, ते एका कार्यालयात मोठ्या डेस्कटॉपवर ‘आदिपुरूष’चा ट्रेलर पाहत आहेत. सध्या उपमुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पटकथा लेखक मनोज मुंतशीर यांना भेट देऊन चित्रपटाबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना शुभेच्छा देताना ट्विट केले की, “रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरूष’ ची मी एक झलक पाहिली. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे आदर्श दर्शविणाऱ्या या चित्रपटाच्या यशासाठी आगाऊ शुभेच्छा.” या पोस्टमध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पटकथा लेखक मनोज मुंतशीरला ही शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis wishes Adipurush Team
New Marathi Serial: वीरूच्या डोळ्यांतलं स्वप्न प्राजक्ता टिपणार ; 'तुजं माजं सपान' नवी मालिका लवकरच येणार भेटीला

आदिपुरुष चित्रपट येत्या १६ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. सोबतच थिएटर्समध्ये प्रदर्शित झाल्याच्या पुढील ५० दिवसांनतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे. ॲमेझॉन प्राईमशी याबाबत करार झाल्याचंही वृत्त काही दिवसांपुर्वी समोर आले होते. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com