Thug Life Trailer  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Thug Life Trailer : कमल हासन यांच्या 'ठग लाइफ' चित्रपटात महेश मांजरेकर यांची वर्णी, कोणती भूमिका साकारणार?

Mahesh Manjrekar : नुकताच कमल हासन यांच्या 'ठग लाइफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये महेश मांजरेकर यांची झलक पाहायला मिळाली आहे.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. अशात बहुप्रतीक्षित चित्रपट 'ठग लाइफ'चा नुकताच (Thug Life Trailer ) धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकाराची वर्णी लागली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आहेत.

'ठग लाइफ'च्या ट्रेलरमध्ये महेश मांजरेकर यांची एक झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात कमल हासन यांची प्रमुख भूमिका आहे. महेश मांजरेकर यांना ट्रेलरमध्ये पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. 'ठग लाइफ' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर यांचा नवीन अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

'ठग लाइफ'ची कथा काय?

'ठग लाइफ'च्या ट्रेलरवरून असे दिसण्यात येते की, कमल हासन एक दत्तक मुलगा घेतो. जो पुढे मोठा होऊन स्वार्थापोटी आपल्याच कुटुंबाला उद्धवस्त करतो. शेवटी कमल हासनच आपल्या मुलाच्या मागे लागतात आणि त्याचा हा खेळ सुरू होतो. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 'ठग लाइफ' चित्रपट 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ठग लाइफ' चित्रपट मणी रत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे.

'ठग लाइफ' स्टारकास्ट

'ठग लाइफ' चित्रपटात कमल हासन आणि महेश मांजरेकर यांच्यासोबतच अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सिलंबरासन टीआर, अशोक सेल्वन,अली फजल, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज असे अनेक कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT