KRK Twit In Shehjada Relatetd Twit Saam TV
मनोरंजन बातम्या

KRK Tweet On Shehjada: केआरकेचा सोशल मीडियावर धक्कादायक खुलासा, म्हणतो 'बड्या प्रॉडक्शन कंपनीने शेहजादाला बदनाम...'

अभिनेता कमाल राशिद खान उर्फ ​​केआरकेने 'शेहजादा' चित्रपटाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

Chetan Bodke

KRK Tweet On Shehjada: सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलग तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत खूपच चर्चेत आहे. १७ फेब्रुवारीला कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान उर्फ ​​केआरकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की बॉलिवूडमधील एका बहुचर्चित प्रॉडक्शन हाऊसने 'शेहजादा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बदनाम करण्याचा कट रचला आहे.

कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा' चित्रपटाची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग रोखण्यासाठी एक बहुचर्चित प्रॉडक्शन हाऊस प्रयत्न करत असल्याचा दावा केआरकेने केला आहे. ही माहिती केआरकेने ट्वीट करत दिली आहे. त्याने ट्विट केले की, 'YRF, धर्मा, टी-सीरीज, रेड चिलीज आणि डिस्ने यांसारखी बॉलिवूडची सर्वात मोठी प्रॉडक्शन हाऊस कंपनी 'शेहजादा' चित्रपटाला चांगली कमाई करण्यापासून रोखत आहे. बघूया उद्या काय होतंय?'

त्यानंतर केआरकेने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने 'शेहजादा'ला फ्लॉप करण्याचा कट रचला जात असल्याचे सांगितले. त्याने लिहिले की, 'शाहरुख खानने शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सर्व चित्रपटगृहांमध्ये केवळ ११० रुपयांमध्ये 'पठान' दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. ''शेहजादा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरुन पूर्णपणे बाजूला करण्यासाठी हा दुसरा हल्ला आहे.'

कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादा आजपासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. रोहित धवन दिग्दर्शित हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. कार्तिकसोबत चित्रपटात क्रिती सेनन, राजपाल यादव, रोनित रॉय, परेश रावलसारखे स्टार्स दिसणार आहेत.

'पठान' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात एकूण 970 कोटी रुपये कमावले असून भारतात 502.45 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT