Hollywood Acton Hero Bruce Willis: हॉलिवूड अ‍ॅक्शन हिरो ब्रूस विलिसची प्रकृती बिघडली, खुद्द परिवाराने केलाच खुलासा

अॅक्शन सुपरस्टारच्या कुटुंबाने ब्रूस विलिसच्या प्रकृतीबाबत आणखी एक खुलासा केला आहे.
Bruce Willis
Bruce WillisInstagram @dobledebruce
Published On

Bruce Willis Health Update: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार ब्रूस विलिस याने वर्षभरापूर्वी गंभीर आजारामुळे आपल्या अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेतला होता. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की अभिनेत्याला वाचाविकाराचा त्रास होत आहे. मात्र आता त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे.

अलीकडेच, अॅक्शन सुपरस्टारच्या कुटुंबाने ब्रूस विलिसच्या प्रकृतीबाबत आणखी एक खुलासा केला आहे. ब्रूस विलिसच्या कुटुंबीयांनी सांगितले की ब्रुसला वाचा विकारानंतर आता फ्रंटोटेम्पोरल डिमेंशियाचे देखील निदान झाले आहे.

Bruce Willis
MC Stan Break Record: काय बोलताय.... MC Stanने थेट किंग खानलाच टाकलं मागे

निवेदनात त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, 2022 मध्ये ब्रूसच्या वाचा विकाराच्या घोषणेनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. परंतु आता आम्हाला कळले आहे की ब्रूसला फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया (एफटीडी) नावाचा आजार देखील आहे. संवादात अडचण येणे हे या आजाराचे लक्षण आहे. हे खूप वेदनादायक आहे, तसेच ब्रूसच्या आजाराबद्दल अधिक जाणून घेतल्यानंतर आम्हालाही दिलासा मिळेल.' ब्रूसच्या आरोग्याशी संबंधित माहिती त्याची मुलगी रुमर विलिसने इन्स्टाग्राम शेअर केली आहे.

फ्रंन्टोटेम्पोरल डिमेंशिया हा भाषेशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांवर परिणाम करणाऱ्या विकारांसाठी वापरली जाणारी एक व्यापक संज्ञा आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वात बदल होतो, बोलण्यात अडचण येते आणि मेंदूच्या भाषेशी संबंधित भागांवर परिणाम करणाऱ्या समस्या सुरू होतात.

अभिनेत्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, विलिसने 1980 च्या दशकात त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, अभिनेता 'द वर्डिक्ट, मूनलाइटिंग, द बॉक्सिंग, होस्टेज, आऊट ऑफ डेथ, ग्लास यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय अभिनेता त्याच्या 'डाय हार्ड' या मालिकेसाठी ओळखला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com