Kaalidhar Laapata Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kaalidhar Laapata: वेगवेगळ्या भूमिका आणि...'; 'कालिधर लपता'चा ट्रेलर पाहून बिग बी थक्क; अभिषेकचं कौतुक करत म्हणाले...

Kaalidhar Laapata Trailer: अभिषेक बच्चनच्या 'कालिधर लपता' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या ट्रेलरमधील अभिषेकचा अभिनय पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

Shruti Vilas Kadam

Kaalidhar Laapata: अभिषेक बच्चनला त्याच्या अभिनयाबद्दल सोशल मिडियावर अनेकदा ट्रोल केले आहे, परंतु त्याने कधीही त्यांची पर्वा केली नाही आणि त्याने त्याच्या कामाने उत्तर दिले. असे अनेक वेळा घडले आहे जेव्हा त्याने स्वतः ट्रोलर्सना योग्य उत्तर दिले आहे. पण अलिकडेच, जेव्हा त्याच्या नवीन चित्रपट 'कालिधर लपता'चा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा सर्वजण अवाक झाले. अभिषेक बच्चनच्या अवताराचे आणि त्याच्या अभिनयाचे नेटकरी कौतुक करत आहेत.

अभिषेक बच्चन लवकरच 'कालिधर लपता' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित झाला होता, जो चर्चेत आहे. चित्रपटात हास्य आणि विनोद, तसेच दुःख अशा भावनांना सुंदर रित्या दाखवण्यात आले आहेत. एका मध्यमवयीन पुरुष आणि एका मुलामधील मैत्रीची गोष्ट अशी आहे की तो पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ शकते.

'कालिधर लपटा' च्या ट्रेलरमध्ये काय आहे?

'कालिधर लपता' मध्ये अभिषेक बच्चनने कालिधर नावाच्या मध्यमवयीन माणसाची भूमिका साकारत आहे. ज्याची स्मरणशक्ती कमकुवत आहे. आयुष्यात त्याला खूपदा विश्वासघात झाला आहे आणि त्याच्या कुटुंबानेही त्याला सोडून दिले आहे. तो या विश्वासघाताच्या वेदनेशी शांतपणे झुंजत आहे. जेव्हा तो गर्दीच्या महाकुंभमेळ्यात भावंडांच्या क्रूर योजनेबद्दल ऐकतो तेव्हा कालिधर स्वतःच्या मर्जीने गायब होण्याचा निर्णय घेतो आणि एका मुलाला भेटतो. योगायोगाने सुरू झालेली भेट ही काहीतरी खोलवरची सुरुवात बनते.

'कालिधर लपता'मधील अभिषेक बच्चनचे कौतुक

या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोक अभिषेक बच्चनच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, 'अभिषेक हा जन्मजात अभिनेता आहे. आम्ही प्रेक्षक म्हणून त्याला ओळखू शकलो नाही आणि फक्त अशा फ्लॉप कलाकारांच्या मागे धावत आहोत ज्यांना अभिनय कसा करायचा हे देखील माहित नाही.' एकाने लिहीले, 'जिसके नसीब में जब सक्सेस लिखी हो, तभी मिलती है आणि अभिषेक बच्चन याचे उत्तम उदाहरण आहे. अभिषेकला नेहमीच कमी लेखले गेले आहे, परंतु तो अधिक यशस्वी होईल.'

अमिताभ बच्चन यांनी केली पोस्ट

विशेष म्हणजे चाहते आणि नेटकऱ्यांव्यतिरिक्त अभिषेक बच्चनचे वडील म्हणजेच बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटर ( X ) वर पोस्ट करत आपल्या मुलाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्यांनी अभिषेक, माझ्या प्रार्थना.. वेगवेगळ्या भूमिका आणि चित्रपट निवडण्याची आणि त्यात स्वतःला झोकून देण्याची तुझी क्षमता.. आणि यशस्वी हो.. हा एक दुर्मिळ गुण आहे.. प्रेम आणि आशीर्वाद. असा ट्विट करून आपले शुभ आशीर्वाद दिले आहेत.

'कालिधर लपता' कधी आणि कुठे पाहायचा?

'कालिधर लपता'मध्ये मोहम्मद झीशान अय्युब आणि दैविक भागेला यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ४ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Z5 वर प्रदर्शित होईल. मधुमिता दिग्दर्शित याा चित्रपटाचे उमेश केआर बन्सल आणि प्रगती देशमुख निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : चोरट्यांचा चोरीचा नवा फंडा; पोलीस असल्याची बतावणी करत दागिने लांबविले

Maharashtra Tourism: तळेगावपासून काही अंतरावर वसलंय 'हे' सुंदर हिल स्टेशन; टेन्शनपासून दूर जाण्यासाठी परफेक्ट ठिकाण

Kolhapuri Food : हे आहेत कोल्हापूरमधील टॉप १० झणझणीत आणि खास डिशेस

Movie Tickets: पाकिस्तानमध्ये चित्रपटाच्या तिकिटाची किंमत किती आहे?

Maharashtra Politics : रमी खेळत नव्हतोच, राजकीय राड्यानंतर कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडिओवर कोकाटे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT