Kajol 
मनोरंजन बातम्या

Kajol: काजोल 'Oops मोमेंट'ची शिकार! सेल्फी काढताना चाहत्याकडून चूक झाली, पण अभिनेत्रीच्या कृतीची प्रशंसाच झाली

Kajol Selfie Moment: अभिनेत्री काजोलचा सेल्फी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये काजोलचे चाहत्यांप्रतींचे प्रेम अनेकांना पाहायला मिळाले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये चाहते काजोलचं कौतुक करत आहेत.

Saam Tv

सोशल मीडियामुळे अनेक सेलिब्रिटींच्या बारिक हालचाली सुद्धा पाहिल्या जातात. अशातच बॉलिवुड अभिनेत्री काजोलच्या फॅनचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा सेलिब्रिटींच्या ऊप्स मोमेंट कॅच करणाऱ्या एका अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री काजोल वांद्रे येथील एका सलून बाहेर दिसली होती. तेव्हा तिचे एक वयोवृद्ध फॅन सेल्फी घेण्यासाठी उभे होते. त्यावेळेस त्यांचा पाय काजोलवर पडला आणि त्यांची रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली.

इन्संट बॉलिवूडने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काजोलने सुंदर शर्ट गॉगल लावून सलुन बाहेर येताना दिसली. तिथेच तिचे अनेक चाहते ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी गर्दी करून होते. त्यावेळेस काजोलने सगळ्यात आधी एका चाहत्याच्या डायरीवर ऑटोग्राफ दिला. त्याच वेळेस तिथे असणारा तिचा एक वृद्ध चाहता मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी धडपड करताना दिसला. तेवढ्यातच तिच्या पायावर त्याने पाय दिला. आणि ऊप्स मोमेंट घडली. तरी सुद्धा अभिनेत्री काजोलने संयम ठेवून त्याला सेल्फी दिला.

काजोलचे हे वागणे चाहत्यांनी वेचले आणि तिचे कमेंट्समध्ये खूप कौतुक केले. तर एका चाहत्याने लिहिले की,' म्हणूनच काजोल माझी आवडती अभिनेत्री आहे. ती कोणत्याही परिस्थितीला शांततेत आणि हासऱ्या चेहऱ्याने सामोरी जावू शकते.' असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

अलिकडेच काजोलने तिच्या आगामी 'मॉं' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. यामध्ये काजोल एक क्रुर आईच्या रुपात चाहत्यांसमोर झळकणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये काजोल तिच्या मुलीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते असे दिसत आहे. यातील मुलीची भूमिका खेरीन शर्माने साकारली आहे. या चित्रपटामध्ये रोनित रॉय आणि इंद्रनील सेनगुप्ता देखील प्रमुख भूमिकांमध्ये असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

SCROLL FOR NEXT