Saam Tv
बॉलिवूड स्टार्स नेहमीच गुंतवणूक करत असताना आपल्याला दिसत असतात.
सध्या अभिनेत्री काजोलने गोरेगावमध्ये आलीशान मालमत्ता घेतल्याची बातमी प्रचंड पसरली आहे.
भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेच लिमिटेडकडून ४३६५ चौरस फूट मालमत्ता काजोलने विकत घेतली आहे.
या मालमत्तेचा करार ६ मार्च २०२५ रोजी झाला आहे.
याची किंमत २८.७८ कोटी आहे. तर काजोलने १.७२ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क भरले आहेत.
तर एक अनोखी बाब म्हणजे काजोलने ५ कार पार्किंगची जागा देखील घेतली आहे.
या पुर्वी काजोलने २०२३ मध्ये ओशिवरामध्ये सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ७.६४ कोटी रुपयांना ऑफिससाठी जागा खरेदी केली आहे.
हे ऑफीस सिनेकलाकांचे कार्यालय आहे. या आजुबाजूच्या परिसरातही अनेक सिनेकार्यालये आहेत.