Nysa Devgan Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

न्यासा देवगनच्या बॉलिवूड एन्ट्रीवर काजोलची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली...

बॉलिवूडचे कपल अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने बॉलिवूडमध्ये अजून पदार्पण केले नसले, तरी तिचे अनेक चाहते आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचे कपल अजय देवगण(Ajay Devgan) आणि काजोल(Kajol) यांची मुलगी न्यासा देवगणने बॉलिवूडमध्ये अजून पदार्पण केले नसले, तरी तिचे अनेक चाहते आहेत. जे नेहमी तिला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. न्यासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. न्यासाचे सोशल मीडियावर अधिकृत खाते नसले तरी तिचे मित्र आणि चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत काजोलने तिच्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. तिची दोन्ही मुले, जे काही करतील त्यात ती त्यांच्या सोबत असेल, असे काजोल म्हणाली.

एका मुलाखतीवेळी काजोल म्हणाली, 'पुढे काय करायचे, कोणते क्षेत्र निवडायचे हा माझ्या मुलांचा प्रश्न आहे, मला वाटते की त्यांना काहीही करायचे असेल, मी त्यांना नेहमी पाठिंबा देईन. मला वाटते की आई म्हणून माझे सर्वात मोठे काम तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मार्गदर्शन करणे नाही, तर तिला ज्या कामातून आनंद मिळतो ते काम करण्यासाठी तिला तयार करणे हे आहे'.

'मला वाटते की न्यासा ही अशी मुलगी आहे जी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते. मी तिला इंडस्ट्रीपासून दूर ढकलत नाही किंवा मी तिला माझ्यासारखी अभिनेत्री व्हायचेही सांगत नाही. ती स्वतः ठरवेल तिला काय करायचं. ती १८ वर्षांची एक सूजाण मुलगी आहे', असे देखील काजोलने सांगितले.

न्यासा देवगन हल्लीच तिच्या मित्रांसोबत व्हॅकेशनसाठी परदेशी गेली होती. तिच्या मित्रांनी तिच्या या व्हेकेशन ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती मित्रांसोबत पार्टी करताना आणि तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT