VIDEO: भावा जिंकलंस! रणवीर सिंह 'या' एका कृतीमुळं ठरला सर्वांपेक्षा वेगळा

न्यूड फोटोशूटमुळे टीकेचा धनी ठरलेला रणवीर सिंग आता कौतुकाचा विषय ठरला आहे.
RanVeer Singh
RanVeer Singh Saam TV

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे वादात सापडला आहे. अनेकांनी त्याच्याविरुद्ध तक्रारी केल्या. भावना दुखावल्याचा आरोप काहींनी केला. फोटोशूटमुळे टीकेचा धनी ठरलेला रणवीर आता कौतुकाचा विषय ठरला आहे. फॅन्सने त्याचा संस्कारी अवतार बघितला आहे. रणवीरने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या मिजवान कॉउचर फॅशन शो २०२२ मध्ये पत्नी दीपिका पदुकोणसोबत(Deepika Padukone) रॅम्प वॉक केला. यादरम्यान रणवीरने त्याच्या आईला बघितले. त्यानंतर रणवीरने जी कृती केली, ती पाहून चाहते रणवीरचं भरभरून कौतुक करत आहेत.

RanVeer Singh
बिपाशा बासू- करण सिंग देणार गूड न्यूज, सोशल मीडियावर चर्चा

डिझायनर मनीष मल्होत्राच्या मिजवान कॉउचर फॅशन शोमधील रणवीर सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग रॅम्पवर चालत असताना आईला बघतो. तो त्याच्या आईजवळ जाऊन तिचा पाया पडतो. एवढेच नाही तर रणवीर त्याच्या बहिणीला किस करतो. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणवीरचे त्याच्या आई आणि बहिणीवरील प्रेम बघून रणवीरचे चाहते भारावून गेले आहेत.

RanVeer Singh
Ananya Pandey : आर्यन खानच्या नात्यावर अनन्या पांडेचा मोठा खुलासा; म्हणाली..

मिजवान कॉउचर फॅशन शोमधील इंडो वेस्टर्न लूकमध्ये रणवीर सिंग खूपच डॅशिंग दिसत होता. रणवीर सिंगच्या आउटफिट्सबद्दल बोलायचे तर त्याने पांढरा चिकनकारी वर्क असलेला ब्लॅक बेस सूट परिधान केला होता. यासोबतच पांढऱ्या रंगाच्या क्रिस्टल हेवी वर्क असलेल्या लेहेंग्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती. दीपिकाचा लूक जबरदस्त होता. यादरम्यान रणवीर-दीपिका हातात हात घालून रॅम्पवॉक करताना 'परफेक्ट कपल'सारखे दिसत होते.

दरम्यान, रणवीरच्या न्यूड फोटोवरून बराच गदारोळ झाला आहे. या अभिनेत्यावर मुंबई आणि इंदूरमध्ये स्त्रियांच्या भावना दुखावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. रणवीर सिंह येत्या डिसेंबरमध्ये रोहित शेट्टीच्या 'सर्कस' चित्रपटात झळकणार आहे. यासोबतच 'बैजू बावरा', 'तख्त', 'सिम्बा २', 'अनियन रिमेक' तसेच 'रॉकी आणि राणी की लव्हस्टोरी' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com