juhi chawla saam tv
मनोरंजन बातम्या

5G Case: अभिनेत्री जुही चावलाचा चांगूलपणा आला कामी; आज मिळाला मोठा दिलासा!.

गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने जूही चावलास दिलासा हाेता.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (DSLSA) आज अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) विरुद्धची 5G प्रकरणातील खर्चाच्या वसुलीबाबतची याचिका मागे घेतली. त्यामुळं दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) हे प्रकरण निकाली निघाले आहे. आजच्या घडामाेडीमुळे जूही चावलास माेठा दिलासा मिळाला आहे. (5G Case Latest Marathi News)

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जूही चावला (juhi chawala) यांना भरावा लागणारा खर्च नुकताच कमी केला हाेता. त्यावेळेस जूही चावलाला दिलासा मिळाला हाेता. (5G) प्रकरणातील आज घडामाेडीमुळं जूही चावलास (juhi chawla) हायसे वाटले असणार हे निश्चित. (Juhi Chawla 5G Case Latest News)

न्यायालयाने आज जूही चावला यांनी पैसे जमा केले का अशी विचारणा केली. त्यावर DSLSA चे वकील सौरभ कंसल यांनी नाही असं म्हटलं. पुढं कंसल यांनी पहिल्या आदेशात बदल केल्यामुळे आणि जूही चावला यांचे सकारात्मक विचार यामुळं याचिका मागे घेत असल्याचे कारण नमूद केले. चावला यांनी DSLSA साठी स्वेच्छेने सामाजिक कार्याचा प्रचार करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे याचिका मागे घेतली जात आहे असं नमूद केले. (Juhi Chawla Latest Marathi News)

यापुर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळेस अभिनेत्री चावला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात (delhi high court) हजर झाली होती. DSLSA च्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये, कायदेशीर मदतीची गरज असलेल्या महिला आणि मुलांचे समर्थन करून सामाजिक सेवा करणे तिच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे असे तिने मान्य करुन कार्य करण्यास संमती दिली हाेती. तिच्या या चांगूलपणाचा विचार करुन तिला ठाेठावण्यात आलेला २० लाखांचा दंड २ लाखांवर आला हाेता. आता याचिका मागे घेतल्याने हा दंड देखील वाचला असं बाेललं जात आहे. (Juhi Chawla 5G Rollout News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT