Judge Frank Caprio Passes Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Judge Frank Caprio: कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी; प्रसिद्ध शो 'कॉट इन प्रोविडेंस'चे जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन

Judge Frank Caprio Passes Away: अमेरिकेतील प्रसिद्ध न्यायाधीश आणि 'कॉट इन प्रोव्हिडन्स' या रिअॅलिटी कोर्ट टीव्ही शोमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले फ्रँक कॅप्रियो यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Judge Frank Caprio Passes Away: अमेरिकेतील प्रसिद्ध न्यायाधीश आणि 'कॉट इन प्रोव्हिडन्स' या रिअॅलिटी कोर्ट शोचे होस्ट फ्रँक कॅप्रियो यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. बराच काळ कर्करोगाशी झुंज देणाऱ्या फ्रँक कॅप्रियो यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्करोगाशी झुंज दिली. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

'जगातील सर्वात छान न्यायाधीश' हा टॅग

जगभरातील लोकांनी फ्रँक कॅप्रियोची यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कारण त्यांनी त्यांच्या कोर्टरूमला न्यायासोबतच मानवतेचेही उदाहरण बनवले. छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये त्यांची दयाळू वृत्ती, गरीब आणि अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देणारे त्यांचे निर्णय अनेकदा इंटरनेटवर व्हायरल झाले. जेव्हा वाहतूक नियम मोडणारे अनेक लोक त्यांच्या कोर्टात पोहोचले तेव्हा कॅप्रियो यांनी त्यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांची परिस्थिती समजून घेत अनेक वेळा दंड माफ केला. या संवेदनशील आणि मानवी निर्णयांमुळे त्यांना जगातील सर्वात दयाळू न्यायाधीश बनवले.

व्हायरल व्हिडिओने आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून दिला

कॅप्रियो यांच्या कोर्टरूमचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. कधी मजेदार पद्धतीने मुलाला प्रश्न विचारणे, कधी वृद्धांना आदर आणि सहानुभूतीने दिलासा देणे असे अनेक क्षण जगभरातील प्रेक्षकांना भावले. त्यांच्या न्यायालयाशी संबंधित व्हिडिओ अब्जावधींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत.

शोची कारकीर्द आणि लोकप्रियता

१९३६ मध्ये रोड आयलंडमधील प्रोव्हिडन्स येथे जन्मलेल्या कॅप्रिओ यांनी अनेक दशके नगरपालिका न्यायाधीश म्हणून काम केले. तथापि, जेव्हा त्यांचे न्यायालयीन शो टीव्हीवर प्रसारित होऊ लागले तेव्हा त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. 'कॉट इन प्रोव्हिडन्स' २०१८ ते २०२० दरम्यान राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाला आणि या शोला अनेक डेटाइम एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. या शोचा मुख्य संदेश असा होता की न्याय फक्त शिक्षा देण्यापुरता मर्यादित नसावा, तर त्यात करुणा, आदर यांचाही समावेश असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ही 'दोन' गणेश मंडळ प्रथेनुसार विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार?

Shocking: पुण्यात खळबळ! रस्त्यावर मधोमध मानवी सांगाडा, पाहून सारेच घाबरले; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : - पुण्यात गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ

तीन तास व्यायाम, उपाशी ठेवलं, गर्भपात अन्...; नोरासारखी फिगर पाहिजे म्हणून पतीकडून पत्नीचा अमानुष छळ|VIDEO

Crime : शाळेत गोळीबाराचा थरार! कानाखाली मारल्याचा राग, विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी

SCROLL FOR NEXT