Jr NTR Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

लक्झरीयस कार आणि अलिशान घर; इतक्या कोटींचा मालक आहे Jr NTR

Jr NTR Net Worth : ज्युनियर एनटीआरचा आज ४१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

टॉलिवूड अभिनेता ज्युनिअर एनटीआर याला वेगळ्या लोकप्रियतेची गरज नाही. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडली आहे. या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा आज ४१ वा वाढदिवस आहे. त्याचं खरं नाव नंदामुरी तारका रामाराव असं आहे. पण त्याला अवघी इंडस्ट्री ज्युनियर एनटीआर नावानेच ओळखते. ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ रोजी तेलंगणातील हैदराबाद शहरात झाला. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

अभिनेता ज्युनियर एनटीआरचे वडील नंदामुरी हरिकृष्णा हे टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. तर अभिनेत्याचे आजोबा आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव हे होते. जरीही एनटीआरचा फॅमिली बॅकग्राऊंड फार तगडा असला तरीही त्याला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी फार स्ट्रगल करावा लागला होता. त्याने आपल्या सिनेकारकिर्दित अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे कौतुक जगभरात कायमच होते. त्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी 'ब्रह्मर्षी विश्वामित्र' चित्रपटातून बालकलाकार म्हणून सिनेविश्वात पदार्पण केले.

एनटीआर अलिशान जीवन जगतो. हैदराबादमधील जुबली हिल्स भागात त्याचा एक आलिशान बंगलाही आहे, ज्याची किंमत २५ कोटींच्या घरात आहे. त्या बंगल्यात तो त्याच्या फॅमिलीसोबत राहतो. या व्यतिरिक्त, अभिनेत्याकडे हैदराबादमध्ये एक अलिशान फार्महाऊस आणि बंगलोर, कर्नाटकसह मुंबईमध्येही अलिशान अपार्टमेंटमध्ये घर आहे. मीडिया रिपोर्टनुसार एनटीआरची एकूण ५५० कोटींची संपत्ती आहे. एनटीआर एका चित्रपटासाठी २० ते २५ कोटी रुपये इतकं मानधन घेतो. याशिवाय तो जाहिरातींमधून आणि प्रमोशनल स्टोरीच्या माध्यमातूनही लाखोंची कमाई करतो.

ज्युनियर एनटीआरकडे Mercedes-Benz, Maybach S-Class, Hyundai Electric Ioniq 5 Black सह अनेक लक्झरीयस कारचे कलेक्शन आहे. ज्यु. एनटीआरकडे दोन महागडे घड्याळ असून त्याचे कपडेही बरेच महागडे आहेत. त्याच्या घड्याळांची किंमत जवळपास ९ कोटीच्या आसपास आहे. त्याच्या कपड्यांचीही किंमत जवळपास लाखोंच्या आसपास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav Khanna : "दिल हमेशा कुर्बान होता है..."; बिग बॉस विजेता गौरव खन्ना अन् आकांक्षा चमोला यांचा 9 वर्षांचा संसार मोडला?

Ajit Pawar funeral: अजितदादा परत या...कार्यकर्त्यांचा बारामतीत हंबरडा, जनसागर लोटला, डोळ्यात अश्रूंच्या धारा!

आता ATM मधून मिळणार १०,२० आणि ५० रुपयांच्या नोटा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT