JollyLLB3 google
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Akshay Kumar : जॉली एलएलबी 3 चित्रपटावर वाद निर्माण झाला आहे. वकीलांचा अपमान केल्याचा आरोप होत असून पुण्यात याचिका दाखल झाली आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसींना कोर्टाने समन्स बजावले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

सागर आव्हाड साम टिव्ही प्रतिनिधी

‘जॉली एलएलबी’ चित्रपटाचे दोन भाग आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून आता या मालिकेचा तिसरा भाग ‘जॉली एलएलबी 3’ येत्या 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र वकील आणि न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाबाबत सध्या वाद निर्माण झाला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली निर्माते आणि कलाकारांनी वकिल व न्यायाधीशांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात यामध्ये करण्यात आला आहे.

पुण्यातील नामांकित वकील ॲड. वाजेद खान (बिडकर) आणि ॲड. गणेश म्हस्के यांनी या संदर्भात दिवाणी न्यायाधीश, पुणे यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये चित्रपटात वकिलांचा बॅण्ड (बो) घालून प्रमोशन केल्यामुळे वकील व्यवसायाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या अर्जावर सुनावणी करत वरिष्ठ विभागातील 12 वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी तसेच चित्रपट निर्मात्यांना समन्स बजावले आहेत. त्यानुसार येत्या 28 ऑगस्ट रोजी अक्षय आणि अर्शद यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत ॲड. वाजेद खान यांनी सांगितले की, ‘जॉली एलएलबी 3’ च्या टीझरमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांचा अवमान केल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे वकील व्यवसायाची प्रतिमा घसरत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा बिगुल वाजलं

Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

SCROLL FOR NEXT