Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक देशातील राज्यांचे मुख्यमंत्री हे त्या राज्याचे प्रमुख मानले जातात.
राज्याच्या विकासाची मोठी जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पार पाडायची असते.
मुख्यमंत्र्यांची जबाबदारी म्हणजे राज्याच्या विकासाबाबतचे निर्णय, कायदे-सुव्यवस्था राखणे आणि लोकांच्या हितासाठी काम करणे.
एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी त्यांना निश्चित पगार आणि इतर सुविधा पुरवल्या जातात.
पण तुम्हाला माहितीये का, देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार सारखा नसतो.
संविधानानुसार मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदऱ्यांचे पगार ठरवण्याचा अधिकार विधानसभेला असतो.
प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती, बजेट आणि राजकीय धोरणांनुसार पगाराचे आकडे वेगवेगळे असतात.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा पगार ३,९०,००० रुपये तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा ३,६५,००० तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पगार ३,४०,००० आहे.