Jolly LLB 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Jolly LLB 3'चा डंका! 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, अक्षय कुमार -अर्शद वारसीची जोडी सुपरहिट

Jolly LLB 3 Box Office Collection Day 13 : अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने 13 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 13 व्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज झाला.

'जॉली एलएलबी 3'ने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'जॉली एलएलबी 3'मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी झळकले आहेत.

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसीचा 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज झाला. चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. 'जॉली एलएलबी 3' हा जॉली एलएलबी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. 'जॉली एलएलबी ' 2013 मध्ये आणि 'जॉली एलएलबी 2 ' चित्रपट 2017 ला रिलीज झाला. चित्रपटाने 13 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने 13 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 13 दिवशी चित्रपटाने 3.85 कोटी कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 100.85 कोटी झाले आहे. 'जॉली एलएलबी 3' चे बजेट 120 कोटी आहे. 'जॉली एलएलबी 3'ने पहिल्या आठवड्यात 74 कोटी , दुसऱ्या आठवड्यात 26 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अक्षयचा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'जॉली एलएलबी 3' हा 15वा चित्रपट आहे. 15 चित्रपटाच्या यादीत हाऊसफुल २ , राउडी राठोड, हॉलिडे, एअरलिफ्ट, हाऊसफुल ३ , रुस्तम, जॉली एलएलबी २ ,टॉयलेट,गोल्ड, २.०, केसरी, हाऊसफुल ४, सूर्यवंशी आणि स्काय फोर्स यांच समावेश आहे.

'जॉली एलएलबी 3'हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी वकिलांच्या भूमिकेत दिसत आहे. 'जॉली एलएलबी 3'मध्ये सौरभ शुक्ला,अमृता राव आणि हुमा कुरेशी या कलाकारांचा समावेश आहे.मीडिया रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' चित्रपट थिएटर रिलीजनंतर जिओहॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer: कॅन्सरची ही लक्षणं शरीरात लपलेली असतात

Curly Hair Care: कुरळ्या केसांसाठी कधीच वापरू नका या ७ गोष्टी, नाहीतर तुमचे केसं कायमचे होतील कोरडे आणि निर्जीव

Cyclone Alert! धोक्याचा इशारा! २४ तासात चक्रीवादळ धडकणार, IMD चा नवा अलर्ट काय?

Maharashtra Dasara Melava Live Update: ज्यांचे शेतं आणि पिक वाहून गेलं 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्यायची- मनोज जरांगे

Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

SCROLL FOR NEXT