Bigg Boss 19 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आले दोन-दोन जॉली; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी स्पर्धकांची घेतली शाळा

Bigg Boss 19: या आठवड्यात सलमानऐवजी 'बिग बॉस १९' च्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये अर्शद वारसी आणि अक्षय कुमार दिसले. या आगामी एपिसोडचा एक प्रोमो देखील रिलीज झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19: शनिवारी, 'बिग बॉस १९' मध्ये, आपल्याला सलमान खानचा दबंग स्टाईल नाही तर अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा मजेदार स्टाईल दिसली. दोघेही स्पर्धकांना मजेदार पद्धतीने धडा शिकवत आहेत. अक्षय आणि अर्शदने कुणालिका, नीलम आणि बसीर अली यांना अशा गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून प्रेक्षकांना खूप आनंद झाला. हे दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आले आहेत.

अक्षय आणि अर्शदने स्पर्धकांची खिल्ली उडवली

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी शोमध्ये येताच त्यांनी प्रथम स्पर्धकांना विचारले, 'तुम्ही इतके तयार का बसला आहात, तुम्हाला लग्नाला जावे लागेल.' मग अर्शद म्हणाला, 'बसीरने तर कपडेही घातलेले नाहीत.' पुढे, तो नीलमला म्हणतो, 'तू गुंड्यामुलींमध्ये अडकली आहेस.' खरं तर, शोच्या इतर महिला स्पर्धकांकडून नीलमला खूप त्रास होत आहे. म्हणून अक्षय असं म्हणाला

अक्षय कुमार कुनिकाचे कौतुक करताना दिसला

अक्षय कुमार पुढे कुनिकाला म्हणाला, 'मी 'खिलाडी' मध्ये तुझ्यासोबत एक गाणे केले होते, तू अजूनही तशीच दिसतेस.' कुनिकाने आभार मानले तेव्हा अक्षय म्हणाला, 'अरे, मला हे सांगायला सांगितलं आहे.' हे ऐकून सगळे हसायला लागले. शेवटी, शोमधील एका स्पर्धकाने अक्षय कुमार आणि अर्शदबद्दल म्हटले, 'दो भाई दोनो तबाही'

'जॉली एलएलबी ३' कधी प्रदर्शित होत आहे

सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी ३' ची कथा शेतकऱ्यांभोवती फिरते. चित्रपटात अक्षय आणि अर्शद यांनी वकील जॉलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी व्यतिरिक्त सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव आणि सीमा बिस्वास हे कलाकार देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

Mumbai-Ahmedabad Highway: अवजड वाहनांच्या 15 किलोमीटरपर्यंत रांगा; चौथ्या दिवशीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Dangers of eating quickly: घाईघाईत जेवणाची सवय तुम्हालाही आहे का? शरीरात सुरू होतो ‘हे’ धोकादायक बदल

Language Conflict : भाषावाद पेटला; हिंदी चित्रपट आणि गाण्यावर बंदी घालणार? दक्षिण भारतातील राज्य मोठा निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT